३४ ग्रामपंचायतींसाठी एकही दाखल नाही अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:38+5:302020-12-30T04:29:38+5:30
दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

३४ ग्रामपंचायतींसाठी एकही दाखल नाही अर्ज
दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र गेल्या पाच दिवसांत दोन सुट्ट्यांचा अपवाद वगळता तीन दिवस उलटून गेले तरीही ३४ ग्रामपंचायतींमध्ये एकाही उमेदवाराने आपला अर्ज भरला नाही. चुरस असलेल्या १८ ग्रामपंचायतींसाठी गटागटाने अर्ज भरले जात आहेत. तीन दिवसांत १८७ उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले.
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट आहे, त्यासाठी अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. त्यात संगणक केंद्रावर मोठी गर्दी आहे. दिवसभर बसून काही उमेदवार गावाकडे परतले. सोमवारी जिल्हा परिषद परिसर आणि न्यायालय परिसरात अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली, परंतु आजही त्यांना अर्ज भरता आले नाहीत. जवळपास ३४ ग्रामपंचायतींचे रकाने रिकामीच राहिले.
--------
ग्रामपंचायतनिहाय उमेदवारी अर्जांची संख्या
राजूर ८ , बक्षीहिप्परगे ५, बोळकवठे २७, तांदूळवाडी ३, संगदरी २, इंगळगी २, लवंगी १२, मद्रे १०, माळकवठे २०, मुळेमुळेगाव १२, मुळेगाव तांडा १३, औराद ९, टाकळी ८, हत्तुर-चंद्रहाळ ७, मुस्ती २५, होटगी ८, भंडारकवठे ३, बोरामणी १३. एकूण १८ ग्रामपंचायती, १८७ अर्ज