उकळत दूध पोटावर पडल्यानं नऊ वर्षाचा साद भाजला
By रवींद्र देशमुख | Updated: February 14, 2024 19:06 IST2024-02-14T19:06:08+5:302024-02-14T19:06:23+5:30
सोलापूर : घरामध्ये पलंगावर बसून गरम केलेेले दूध पित असताना अचानक हातातून कप निसटला आणि उकळलेलं दूध पोटावर पडल्यानं ...

उकळत दूध पोटावर पडल्यानं नऊ वर्षाचा साद भाजला
सोलापूर : घरामध्ये पलंगावर बसून गरम केलेेले दूध पित असताना अचानक हातातून कप निसटला आणि उकळलेलं दूध पोटावर पडल्यानं नऊ वर्षाचा बालक भाजला. बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज गावात ही घटना घडली. साद समीर शेख (वय- ९, रा. हिरज) असे या भाजलेल्या बालकाचे नाव आहे.
यातील भाजलेला नऊ वर्षाचा साद घरामध्ये पलंगावर बसून नातलगांशी बोलत कपातून दूध पित होता. बोलण्याच्या नादात त्याच्या हातातून कप निसटला तो थेट पोटावर पडला. गरम दुधामुळे अंगातील सदऱ्यातून पोटाला चटका बसल्याने पोटास इजा झाली. तातडीने त्याला वडिल समीर यांनी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असून, तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.