लग्नानंतर १३ दिवसांतच नवविवाहितेची करमाळ्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:23 IST2021-09-11T04:23:26+5:302021-09-11T04:23:26+5:30

करमाळा : शहरातील सिंचननगर भागातील नवविवाहितेने विषारी औषध प्रशान करून आत्महत्या केली. लग्नानंतर केवळ १३ दिवसांत तिने आत्महत्या ...

Newlyweds commit suicide in Karmala within 13 days after marriage | लग्नानंतर १३ दिवसांतच नवविवाहितेची करमाळ्यात आत्महत्या

लग्नानंतर १३ दिवसांतच नवविवाहितेची करमाळ्यात आत्महत्या

करमाळा : शहरातील सिंचननगर भागातील नवविवाहितेने विषारी औषध प्रशान करून आत्महत्या केली. लग्नानंतर केवळ १३ दिवसांत तिने आत्महत्या केली असून तिच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आरती कोळेकर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून ९ सप्टेंबर रोजी करमाळा शहरात ही घटना घडली. आरती हिचा विवाह १३ दिवसांपूर्वी २७ ऑगस्ट रोजी रोहित कोळेकर याच्याशी झाला होता. आरती यांच्या आईवडिलांचे गाव भिगवण असून ती रोहितच्या मामाची मुलगी होती.

गुरुवारी दुपारी १ वाजता आरतीने विषारी औषध प्राशन केले. तिला त्रास होवू लागल्यावर घरातील लोकांना तिने विष प्राषण केल्याचे समजले. त्यानंतर तिला तत्काळ उपचारासाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु परिस्थिती पाहून डाॅक्टरांनी त्यांना इतर खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले.

त्यानंतर कोळेकर परिवाराने तिला अकलूजच्या खासगी रुग्णांलयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असतानाच रात्री ७.१५ वाजता निधन झाले. त्यानंतर अकलूज पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि शवविच्छेदन करण्यात आले. तिच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजलेले नाही.

Web Title: Newlyweds commit suicide in Karmala within 13 days after marriage