शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नवख्या ट्रेकर्सची हिमालयावर १५००० फूट चढाई, दिल्ली विधानसभेत कौतुक, सोलापूरच्या माय-लेकीचे गिर्यारोहण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 4:20 PM

पायोनिअर ट्रेकिंग ग्रुप ३६० एक्स्प्लोररच्या माध्यमातून सोलापूर, अकलूजसह राज्यातील १५ नवख्या ट्रेकर्सनी हिमालयीन शिखरावर १५ हजार फुटांची यशस्वी चढाई केली.

ठळक मुद्देपायोनिअर ट्रेकिंग ग्रुप ३६० एक्स्प्लोररच्या माध्यमातून सोलापूर, अकलूजसह राज्यातील १५ नवख्या ट्रेकर्सनी हिमालयीन शिखरावर १५ हजार फुटांची यशस्वी चढाईगुडघ्याइतक्या बर्फातून मार्ग काढत या टीमने पुढील चढाई पूर्ण केलीअर्चना तावनिया यांनी पहिल्यांदा गिर्यारोहण करताना पंधरा हजार फुटांची हिमालयावरील उंची गाठण्याचे धाडस केले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : पायोनिअर ट्रेकिंग ग्रुप ३६० एक्स्प्लोररच्या माध्यमातून सोलापूर, अकलूजसह राज्यातील १५ नवख्या ट्रेकर्सनी हिमालयीन शिखरावर १५ हजार फुटांची यशस्वी चढाई केली. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे आणि सहकाºयांनी या चौदा ते पन्नास वयोगटाच्या नवीन गिर्यारोहकांना मार्गदर्शन केले. सोलापूरच्या अर्चना तावनिया व पूर्वा तावनिया या माय-लेकींचाही या मोहिमेत सहभाग होता.  एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे काम करत असलेल्या युनायटेड नेशन्सच्या हीफॉरशी या स्त्री-पुरुष समानतेसाठी ही मोहीम समर्पित होती शिवाय अंबेजोगाईच्या विजय चाटे या युवकाने ‘आॅर्गन डोनेशन’ जागृतीसाठी या मोहिमेद्वारे काम सुरु केले असून, १५००० फुटांवरून त्याने याबाबतचा संदेशही दिला आहे.या मोहिमेचा प्रारंभ २० डिसेंबर रोजी झाला. २३ डिसेंबरला मनाली येथून सुरुवात करून १०००० व १२००० फुटांवर दोन कॅम्प सेट करून या टीमने पुढील चढाई केली. गुडघ्याइतक्या बर्फातून मार्ग काढत या टीमने पुढील चढाई पूर्ण केली. या टीमकडे कोणताही अनुभव नसताना इतकी उंची गाठणे या टीमसाठी मोठी गोष्ट होती. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे, बालाजी जाधव, करण पंजाबी, निहाल बागवान या सर्वांच्या प्रेरणेमुळे व मार्गदर्शनामुळे या सर्वांनी हे करून दाखवले. पुणे येथील उद्योजिका सुषमा कोलवणकर, मयुरी लाटे, किशोर दाते, माधवी मिनासे यांच्यासोबत सांगली येथील गायत्री ओझा यांनीही हा ट्रेक पूर्ण केला. अकलूज येथील प्राथमिक शिक्षक असलेले कृष्णदेव माने या शिक्षकानेही सरधोपट मार्ग सोडून वेगवेगळे अनुभव घेतले. वालचंद अभियांत्रिकी कॉलेजमधील साक्षी सिंघलने १५००० फुटांवर चढाई करून ‘शिक्षणासोबत इतर साहसी कामगिरी केली पाहिजे’ असा संदेश दिला. या मोहिमेनंतर दिल्ली विधानसभेत या टीमचे कौतुक झाले व दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामविलास गोयल यांनी या टीमचे अभिनंदन केले. ---------------------अर्चना तावनियांचे धाडस- अर्चना तावनिया यांनी पहिल्यांदा गिर्यारोहण करताना पंधरा हजार फुटांची हिमालयावरील उंची गाठण्याचे धाडस केले. विशेष म्हणजे त्या अनेक वर्षांनंतर घराबाहेर पडल्या होत्या. मुलींसोबत ट्रेकिंग करताना आनंद वाटला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. माधवी मिनासे यांनीही एक्स्प्लोररच्या नियोजनाचे कौतुक केले. या मोहिमेमुळे आत्मविश्वास वाढल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Solapurसोलापूर