नवा आदेश; सोलापूरच्या ग्रामीण भागातील दुकाने शनिवार अन् रविवारी बंदच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 01:34 PM2021-04-02T13:34:24+5:302021-04-02T13:38:36+5:30

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढले

New order; Shops in rural Solapur will remain closed on Saturdays and Sundays | नवा आदेश; सोलापूरच्या ग्रामीण भागातील दुकाने शनिवार अन् रविवारी बंदच राहणार

नवा आदेश; सोलापूरच्या ग्रामीण भागातील दुकाने शनिवार अन् रविवारी बंदच राहणार

Next

सोलापूर : कोरोना रुग्णांची दररोजची वाढती संख्या लक्षात घेऊन याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेले निर्बंध येत्या १५ एप्रिलपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेतच सुरू राहतील. दरम्यान, येत्या शनिवार व रविवारीही दिवसभर सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढले आहेत.

औषधे, भाजीपाला, फळे, किराणा, दूध व वृत्तपत्र या जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांना पूर्वीप्रमाणेच वगळले असून या सेवा नियमित सुरू ठेवता येणार आहेत. नव्या आदेशानुसार येत्या १५ एप्रिलपर्यंत दहावी व बारावी वगळता सर्व शाळा, खासगी शिकवणी वर्ग बंद राहतील, तर खेळ, सामने यात्रा, उत्सव, वारी यावरीलही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार हे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. होमडिलिव्हरी व वितरणासाठी मात्र रात्री दहापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. नागरिकांनी विनाकारण गर्दी न करता कोरोनापासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Web Title: New order; Shops in rural Solapur will remain closed on Saturdays and Sundays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.