शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

सोलापुरातील शिस्त अन् पोलिसिंग दाखविणार नवे फौजदार उपराजधानीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 1:04 PM

अकरा फौजदारांचा केला निर्धार; पोलीस आयुक्तालयाचा निरोप घेताना गहिवरले

ठळक मुद्देपोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या ११ फौजदारांना शुभेच्छा देताना काही टिप्सही दिल्यानिरोप मिळालेले अकरा फौजदार लवकरच उपराजधानीत दाखल होणार फौजदार परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्यांचा पोलीस महासंचालक कार्यालयाकडून त्यांना बढती

सोलापूर : अनेक वर्षे शहर पोलीस दलात काम केले. इथून लागलेली शिस्त अन् सोलापुरी पोलिसिंग उपराजधानी नागपुरी दाखविण्याची संधी आहे. या संधीचं सोनं करून सोलापूर पोलीस आयुक्तालयाचे नाव नागपुरी जनतेच्या हृदयात उमटवू, असा जणू निर्धार नव्याने फौजदार झालेल्यांनी कार्यक्रमस्थळी केला. सोमवारी सकाळी पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाºयांचा निरोप घेताना हे फौजदार गहिवरले होते.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या ११ फौजदारांना शुभेच्छा देताना काही टिप्सही दिल्या. घरापासून दूर जात असला तरी तेथे प्रामाणिकपणाने ड्यूटी बजावा. सोलापूरचे नाव रोशन करा, असा सल्लाही त्यांनी दिला. निरोप मिळालेले अकरा फौजदार लवकरच उपराजधानीत दाखल होणार आहेत.

निरोप समारंभावेळी पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त वैशाली दरेकर, सहायक पोलीस आयुक्त कमलाकर ताकवले, वेल्फेअरचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे आदी अधिकारी उपस्थित होते.

पोलीस खात्यांतर्गत फौजदार परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्यांचा पोलीस महासंचालक कार्यालयाकडून त्यांना बढतीही देण्यात आली. काही जण कोकणात जाणार तर एक जण अमरावतीला. महामार्ग पोलीस दलात दोन तर ११ जण नागपूरला जाण्यासाठी सज्ज होत आहेत.

या पोलिसांची झाली नागपुरात नियुक्ती...पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले सहायक फौजदार अविनाश घोडके, नंदकिशोर कवडे, विजयकुमार लट्टे, प्रकाश खडतरे, हनुमंतराव बादोले, हेमंत काटे, शिवपुत्र हरवलकर, श्रीकांत जाधव, योगीराज गायकवाड, माधव धायगुडे, सूरज मुलाणी, सतीश भोईटे, नीलकंठ तोटदार, बाळासाहेब उन्हाळे, नरसप्पा राठोड, प्रकाश किणगी, सरताज शेख, राजकुमार परदेशी, नागनाथ कानडे, प्रभाकर पात्रे यांना फौजदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे. यातील नऊ जणांना शहरांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरnagpurनागपूरPoliceपोलिसSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस