शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

छत्रपतींचा इतिहास जपण्याची गरज, अमोल कोल्हे यांचे मत, शिवरायांचा इतिहास महाराष्टÑाबाहेर समजला जावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 11:12 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही अष्टपैलू व्यक्तिमत्त्वं असून त्यांचा इतिहास हा सतत जागता ठेवत जपण्याची गरज आहे

ठळक मुद्देमहानाट्याच्या प्रयोगानिमित्ताने सोलापुरात आलेले डॉ. कोल्हे यांनी बुधवारी लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट इतिहास हा केवळ मढी उकरण्यासारखा नसून त्यातून काहीतरी शिकले पाहिजे : डॉ. कोल्हेशिवरायांच्या राजनीती, व्यवस्थापन, ध्येयनिष्ठा आदी कितीतरी गोष्टी आजच्या काळात उपयुक्त : डॉ. कोल्हे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही अष्टपैलू व्यक्तिमत्त्वं असून त्यांचा इतिहास हा सतत जागता ठेवत जपण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘ शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातील संभाजीची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. महानाट्याच्या प्रयोगानिमित्ताने सोलापुरात आलेले डॉ. कोल्हे यांनी बुधवारी लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे व मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधीचे प्रमुख ओमप्रकाश शेटे हेही उपस्थित होते. इतिहास हा केवळ मढी उकरण्यासारखा नसून त्यातून काहीतरी शिकले पाहिजे, असे सांगून अमोल कोल्हे म्हणाले की, शिवरायांच्या राजनीती, व्यवस्थापन, ध्येयनिष्ठा आदी कितीतरी गोष्टी आजच्या काळात उपयुक्त आहेत. ज्या शिवरायांना आपण दैवत मानतो ते शिवराय महाराष्टÑापलीकडे फारसे माहीत नाहीत, अशी खंत व्यक्त करताना आपल्या शालेय अभ्यासक्रमातही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे कोल्हे यांनी सांगितले. आपल्या अभ्यासक्रमात मुसोलिनी, नेपोलियन, फ्रेंच राज्यक्रांती शिकविली जाते; पण शिवरायांचा इतिहास दुर्लक्षित केला जातो हे कटूसत्य आहे, असे ते म्हणाले. छत्रपती संभाजीची भूमिका हा माझा ड्रीम रोल होता. त्यात पूर्ण क्षमतेने जीव ओतत आहे. सलग १८ वर्षे एका शहेनशहाची झोप उडवणाºया शिवपुत्राचा इतिहास नव्या पिढीला समजणे गरजेचे असून त्यासाठी या नाट्याच्या व मालिकेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांची विचार करण्याची पद्धत आणि क्रम बदलले असल्याने ते अवघड असले तरी खारीचा वाटा म्हणून आम्ही तो इतिहास जागता ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. छत्रपतींचा इतिहास व्यापक पातळीवर पोहोचण्यासाठी शिवप्रेमींनी एकत्र यायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.  प्रारंभी लोकमतचे संपादक राजा माने यांनी डॉ. कोल्हे व शेटे यांचा सत्कार केला. डॉ. शिवरत्न शेटे यांचा सत्कार सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी केला. ---------------------- बिनपैशाचं खातं सांभाळण्याची जबाबदारी आली असली तरी लोकमतसारख्या मीडियामुळे दिलासा मिळाला. दररोज चारशे रुग्ण भेटतात पण कधीही थकवा जाणवत नाही. अडल्या-नडल्या लोकांना मदत केल्याचं फार मोठं समाधान मिळतं, त्यामुळे आतापर्यंत २१ लाख लोकांपर्यंत पोहोचून एक हजार कोटींची मदत वाटप करणे शक्य झाले. - ओमप्रकाश शेटे, मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाचे प्रमुख

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Bhavanलोकमत भवन