शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर चेहरा अन् चमकदार केसांसाठी पौष्टिक आहार आवश्यक : तृप्ती राठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 13:08 IST

‘माय हेअर..माय स्किन..’ या केस व त्वचाविषयक आरोग्यावर साधला संवाद

ठळक मुद्देचेहºयावरील सुरकुत्या, वांग व काळे डाग यामुळे काही जण सतत चिंतेत असतात - डॉ. तृप्ती राठीचिंता न करता डॉक्टरांना ती चिंता दाखवून लवकर निदान करून घ्यावे - डॉ. तृप्ती राठीकोरोनाच्या काळात सखींनी स्वत:ची काळजी घ्यावी - डॉ. तृप्ती राठी

सोलापूर : प्रदूषण, आजार, पौष्टिक आहाराचा अभाव यांच्यामुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचे प्रमाण वाढले आहे. केसांची योग्य काळजी न घेणे, केस कापण्याची चुकीची पद्धत, जीवनसत्त्व तसेच प्रोटीनचा अभाव यामुळे केसांच्या असंख्य समस्या निर्माण होतात. शरीराप्रमाणेच केसांनाही पोषकतत्त्वांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. सुंदर आणि चमकदार केसांसाठी पौष्टिक आहाराचेही सेवन करावे, असा सल्ला डॉ. तृप्ती राठी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिला.

‘लोकमत सखी मंच’च्या माध्यमातून ‘स्मार्ट सखी.. डिजिटल सखी’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘लोकमत’ सखी मंच व डॉ. राठीज् यांचे द्वारका क्लिनिक स्किन, हेअर व लेसर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘माय हेअर..माय स्किन..’ या केस व त्वचाविषयक आरोग्यावर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून डॉ. तृप्ती राठी यांनी सखींशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी डॉ. राठी यांनी सौंदर्याविषयी माहिती दिली. पिंपल्स, व्रण, केसांच्या विविध समस्या, चेहºयावरील सुरकुत्या, वांग व काळे डाग यामुळे काही जण सतत चिंतेत असतात. चिंता न करता डॉक्टरांना ती चिंता दाखवून लवकर निदान करून घ्यावे, असा सल्ला डॉ. राठी यांनी यावेळी दिला.

याचवेळी सखींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. तृप्ती राठी यांनी समर्पक उत्तरे देऊन सखींचे समाधान केले. कोरोनाच्या काळात सखींनी स्वत:ची काळजी घ्यावी, शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असेही आवाहन डॉ. राठी यांनी यावेळी केले.

खानपानात बदल अन् ताणतणावामुळे केस पांढरेसध्या लहान मुलांमध्ये पांढरे केस होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. चौथी, पाचवीला जाणारीही मुले, मुली केसाला वेगवेगळ्या प्रकारचे कलर लावत असल्याचे चित्र दिसत आहे. लहान वयात केस पांढरे का होतात, यावर बोलताना डॉ. तृप्ती राठी यांनी सांगितले की, पांढरे केस होण्याची दोन कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे ताणतणाव अन् दुसरे म्हणजे खाण्यात झालेला बदल. पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य तो उपचार घ्यायला हवा. शक्यतो डाय, मेहंदी अथवा कोणत्याही प्रकारचे रासायनिक द्रव्य केसाला लावू नका, असाही सल्ला डॉ. तृप्ती राठी यांनी दिला.

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यHair Care Tipsकेसांची काळजीFairजत्रा