तुम्हाला जॉब हवा आहे का? मग गुरूवारी बार्शीत या; जाणून घ्या सविस्तर बातमी

By Appasaheb.patil | Updated: April 24, 2023 16:31 IST2023-04-24T16:31:22+5:302023-04-24T16:31:40+5:30

या रोजगार मेळाव्यासाठी सोलापूर, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजी नगर व औद्योगिक परिसरातील एकूण ११ पेक्षा जास्त नामांकित उद्योजक सहभागी होणार आहेत.

need for a job barshi maharashtra pandit dindayal job fair mumbai pune chatrapati sambhaji nagar | तुम्हाला जॉब हवा आहे का? मग गुरूवारी बार्शीत या; जाणून घ्या सविस्तर बातमी

तुम्हाला जॉब हवा आहे का? मग गुरूवारी बार्शीत या; जाणून घ्या सविस्तर बातमी

सोलापूर : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, सोलापूर आणि एम. आय. टी. कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार २७ एप्रिल रोजी एम. आय. टी. कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च, बार्शी येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यासाठी सोलापूर, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर व औद्योगिक परिसरातील एकूण ११ पेक्षा जास्त नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून एकूण २१०० पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. ही सर्व रिक्त पदे किमान १० वी, १२ वी, पदवीधर, बी. ए., बी. कॉम., डिप्लोमा, इंजिनिअरिंग, बी. एस्सी. एम. एस्सी, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, आय.टी.आय, बी. फार्म, डी. फार्म, नर्सिंग, लॅब टेक्निशियन, पॅरामेडिकल, मॅकेनिक इत्यादी विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून, सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या कागदपत्रांसह २७ एप्रिल २०२३ रोजी ठीक १० वाजता एम.आय.टी. कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च, बार्शी येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: need for a job barshi maharashtra pandit dindayal job fair mumbai pune chatrapati sambhaji nagar