मोहोळच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या आजी-माजींनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:23 IST2021-07-31T04:23:31+5:302021-07-31T04:23:31+5:30

राज्यातील विधानसभेच्या रिक्त होणाऱ्या व राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या जागेवर राजन पाटील यांना संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असा ...

NCP's grandparents turned their backs on Mohol's meeting | मोहोळच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या आजी-माजींनी फिरवली पाठ

मोहोळच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या आजी-माजींनी फिरवली पाठ

राज्यातील विधानसभेच्या रिक्त होणाऱ्या व राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या जागेवर राजन पाटील यांना संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास आमदार यशवंत माने यांनी व्यक्त शुक्रवारी राष्ट्रवादीच्या ‘कार्यकर्ता संवाद’ बैठकीत बोलताना केला. मोहोळ नागरी पतसंस्थेच्या सभागृहात ही बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी माजी आमदार राजन पाटील होते. यावेळी पं. स. सदस्य अंजिक्यराणा पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, जि.प. सदस्य शिवाजी सोनवणे, जालिंदर लांडे, नानासाहेब डोंगरे, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, यशोदाताई कांबळे, अस्लम चौधरी, ज्ञानेश्वर चव्हाण, भारत सुतकर, सभापती रत्नमाता पोतदार, रामदास चवरे, सागर चवरे, सज्जनराव पाटील, महेश पवार, नगरसेवक अतुल गावडे, कुंदन धोत्रे, राजाभाऊ सुतार , रामराजे कदम, नगरसेवक मुश्ताक शेख आदी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कामकाज जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम चालू आहे. तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष-संघटना मजबूत करावी, असे आवाहनही राजन पाटील यांनी केले.

----

आजी-माजी यांची अनुपस्थिती

तालुका राष्ट्रवादीच्या बैठकीला जि. प. सदस्य व राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश समन्वयक रमेश बारसकर, माजी उपसभापती मानाजीराव माने, युवकचे माजी जिल्हा अध्यक्ष विक्रांत माने यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवले.

---

तालुक्यात पक्षाचे काम करताना माझ्याकडे येऊन जे मोठे झाले आणि आज विरोधात गेले आहेत त्यांना मी कधी बोलावलेच नव्हतं. ते स्वत:हून आले होते. त्यामुळे त्यांचा आमचा काही संबंधच नाही, असे सांगत तालुक्यात भविष्यातही मी एकट्याच्या जिवावर आमदार निवडून आणू शकतो.

- राजन पाटील, माजी आमदार

-----

Web Title: NCP's grandparents turned their backs on Mohol's meeting