शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा, भाजप भगावो, रोजगार बचावो चा राष्ट्रवादीच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 13:11 IST

भाजप भगावो, रोजगार बचावो, बेरोजगार तरुणांची फसवणूक बंद करा, अशा विविध घोषणा देत सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर युवकांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देसोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर युवकांचा आक्रोश मोर्चाशासनाने अनेक शासकीय विभाग नोकरभरती टाळून युवकांवर बेरोजगारीची वेळ आणली : राष्ट्रवादीलोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी दरवर्षी देशातील २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली : राष्ट्रवादी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : भाजप भगावो, रोजगार बचावो, बेरोजगार तरुणांची फसवणूक बंद करा, अशा विविध घोषणा देत सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर युवकांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.चार हुतात्मा पुतळा येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस संग्राम कोते-पाटील, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष भारत जाधव, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा विद्या लोलगे, सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जुबेर बागवान, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विक्रांत माने, माजी प्रदेश युवक अध्यक्ष उमेश पाटील आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भारतीय जनता पार्टीने २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी दरवर्षी देशातील २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली. आज या शासनाला चार वर्षे झाली तरी आश्वासनांची पूर्तता झाली नाही. भाजपने दिलेल्या आश्वासनांप्रमाणे वर्षाला २ कोटीप्रमाणे चार वर्षांत ८ कोटी युवकांना नोकरी देणे अपेक्षित होते. सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात पुन्हा ७० लाख युवकांना रोजगार देऊ, अशी खोटी व फसवी आश्वासने दिलेली आहेत. शासनाच्या सर्व योजना फसल्या आहेत. कौशल्य विकास योजनेच्या राज्यामध्ये ७ हजार २५२ प्रशिक्षण संस्था आहेत. त्यांचे अनुदान देण्यात आले नाही. ५५ हजार कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. डी. एड., बी. एड. झालेल्या युवकांच्या नोकºयांचा प्रश्न प्रलंबित आहे. शासनाने अनेक शासकीय विभाग नोकरभरती टाळून युवकांवर बेरोजगारीची वेळ आणली आहे आदी समस्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी आप्पाराव काळे, प्रशांत बाबर, मल्लेश बडगू, रूपेश भोसले, कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस