राष्ट्रवादीला मोठा धक्का, भगीरथ भालके यांचा बीआरएस पक्षात प्रवेश

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: June 27, 2023 13:07 IST2023-06-27T13:06:44+5:302023-06-27T13:07:24+5:30

भगीरथ भालके यांच्या निवासस्थानी आयोजित शेतकरी मेळाव्यात 'अबकी बार, किसान सरकार' अशी घोषणा देत बंगारु तेलंगणाचा (गोल्डन तेलंगणा) विकास पॅटर्न महाराष्ट्रात अभिमानाने राबविणार असल्याचे सांगितले.

NCP leader Bhagirath Bhalke to join BRS, Pandharpur | राष्ट्रवादीला मोठा धक्का, भगीरथ भालके यांचा बीआरएस पक्षात प्रवेश

राष्ट्रवादीला मोठा धक्का, भगीरथ भालके यांचा बीआरएस पक्षात प्रवेश

सरकोली : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वावर टीका करत महाराष्ट्रात परिवर्तनाची हाक दिली. सरकोली (ता.पंढरपूर) येथील भगीरथ भालके यांच्या निवासस्थानी आयोजित शेतकरी मेळाव्यात 'अबकी बार, किसान सरकार' अशी घोषणा देत बंगारु तेलंगणाचा (गोल्डन तेलंगणा) विकास पॅटर्न महाराष्ट्रात अभिमानाने राबविणार असल्याचे सांगितले.

यावेळी भगीरथ भालके यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारत राष्ट्र समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री केसीआर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी बीआरएस पक्षाचे महाराष्ट्र  समन्वयक माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, बाळासाहेब देशमुख, माणिकराव कदम तसेच अर्थमंत्री हरीश राव हे व्यासपीठावर उपस्थित होते.

Web Title: NCP leader Bhagirath Bhalke to join BRS, Pandharpur