शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

National Mathematics Day : गणित अवघड मानणाºया विद्यार्थ्यांची संख्या सोलापुरात म्हणे सर्वाधिक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 12:26 IST

सोलापूर : गणित विषय आवडीने अभ्यासणारे विद्यार्थी नेहमीच उच्च श्रेणीत येतात़ कदाचित गुणवत्ता यादीतही येतात़ पण हे प्रमाण एकूण ...

ठळक मुद्देगणित विषय रुक्ष व कठीण आहे़ गणित विषय आत्मसात करण्याची क्षमता मोजक्या व्यक्तींमध्येचगैरसमजामुळे विद्यार्थ्यांच्या मनात गणित विषयाची नावड कायमपणे होते़गणित विषय फार अवघडही नाही व तो फार सोपाही नाही़ तर गणित विषय ‘वेगळा’ आहे़

सोलापूर : गणित विषय आवडीने अभ्यासणारे विद्यार्थी नेहमीच उच्च श्रेणीत येतात़ कदाचित गुणवत्ता यादीतही येतात़ पण हे प्रमाण एकूण विद्यार्थी संख्येच्या तुलनेत अत्यल्प आहे़ दुसºया बाजूला ‘गणित विषय अतिशय अवघड व आपल्याला जमणार नाही’ असा समज करून या विषयापासून दूर राहणाºयांची संख्या सोलापुरात सर्वाधिक आहे, म्हणून विद्यार्थ्यांसाठी ज्ञानरचनावादी गणित प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी शासनाने पावले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे सोलापूर जिल्हा उच्च माध्यमिक गणित शिक्षक संघाने.

२२ डिसेंबर हा थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिवस ‘राष्ट्रीय गणित दिवस’ म्हणून साजरा केला जातो़ या दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा उच्च माध्यमिक गणित शिक्षक संघाच्या सदस्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधत इतर विषयांप्रमाणे अपेक्षा व्यक्त केल्या.

आजच्या स्पर्धात्मक, संगणकीय युगात गणिताशिवाय तरुणोपायी नाही़ म्हणून शिक्षकांनी व्यावहारिक व अत्यंत सोप्या गणिताच्या मूलभूत प्रक्रिया साधनांचा वापर करून सहजपणे विद्यार्थ्यांसमोर ठेवून ‘हा विषय मी सहजपणे शिकू शकेन’ असा आत्मविश्वास निर्माण करणे, ही मूलभूत गरज आहे़ विद्यार्थ्याला एखाद्या विषयाची भीती वाटत असेल तर शिकण्यातील रस कमी होऊन तो त्यापासून लांब पळू लागतो़ पण तोच विषय जर आवडायला लागला तर तो सोपाही वाटतो, शिकण्यातून आनंदही मिळविता येतो.

गणित प्रयोगशाळा- गणिताच्या शिक्षकाला खडू-फळा न वापरता शिकविणे अवघड असते, हा सामान्यत: सर्व शिक्षकांचा अनुभव आहे़ गणितामध्ये असलेली आकडेमोड, सूत्रांचा वापर, कूट प्रश्न सोडविण्यासाठी लागणाºया अमूर्त आणि प्रात्यक्षिकांचा अभाव यामुळे गणित हा विषय अमूर्त वाटून त्याबद्दल गोडी निर्माण होत नाही़ प्रसिद्ध चिनी म्हणीप्रमाणे, मी ऐकलं-मी विसरलो, मी पाहिले-माझ्या लक्षात राहिले, मी केले-मला समजले़ यातील ‘करणे’ व ‘समजणे’ होण्यासाठी गणित शिक्षकांनी नवनिर्मितीचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांना सक्रिय करणे आवश्यक आहे़ यासाठी गणित सक्रिय पद्धतीने शिकविण्यासाठी गणित प्रयोगशाळांची नितांत आवश्यकता आहे़ 

गणिताविषयी गैरसमज - गणित विषय रुक्ष व कठीण आहे़ गणित विषय आत्मसात करण्याची क्षमता मोजक्या व्यक्तींमध्येच असते, असा गैरसमज गणितात अपयशी ठरलेल्यांकडून कळत-नकळत पसरवला जातो़ अशा प्रकारच्या गैरसमजामुळे विद्यार्थ्यांच्या मनात गणित विषयाची नावड कायमपणे होते़ यासाठी शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी हे एकदा मान्य केले पाहिजे की, गणित विषय फार अवघडही नाही व तो फार सोपाही नाही़ तर गणित विषय ‘वेगळा’ आहे़ हे का एकदा समजावून घेतले की, तुमचा पालक किंवा शिक्षक म्हणून पाल्य किंवा विद्यार्थी यांच्याशी योग्यप्रकारे संवाद सुरू होईल़ 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा