नातेपुते कृषी मंडल कार्यालय राज्यात ठरले अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:21 IST2021-03-20T04:21:26+5:302021-03-20T04:21:26+5:30

नातेपुते : व्यवस्थापन, कौशल्य, कामाचा दर्जा व प्रतवारी, कार्यतत्परता, गुणवत्ता, सेवा, प्रचार प्रसिद्धी, सल्ला या बाबींसाठी नातेपुते मंडल ...

Natepute Krishi Mandal office became the top in the state | नातेपुते कृषी मंडल कार्यालय राज्यात ठरले अव्वल

नातेपुते कृषी मंडल कार्यालय राज्यात ठरले अव्वल

नातेपुते : व्यवस्थापन, कौशल्य, कामाचा दर्जा व प्रतवारी, कार्यतत्परता, गुणवत्ता, सेवा, प्रचार प्रसिद्धी, सल्ला या बाबींसाठी नातेपुते मंडल कृषी कार्यालयास आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ISO-9001:2015 हे मानांकन प्राप्त झाले आहे.

अशाप्रकारे मंडल कार्यालयास मानांकन मिळण्याची बहुदा राज्यातील पहिले मंडल कृषी अधिकारी कार्यालय आहे. यासाठी तालुका कृषी अधिकारी गजानन ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी सतीश कचरे यांच्या प्रयत्नातून हे मानांकन मिळाले.

नातेपुते कृषी मंडल कार्यालयास अभिलेख वर्गीकरण, नगण्य फायली, नस्ती प्रस्ताव प्रलंबितता, योजनानिहाय फॉलो चार्ट, कार्यालय असे विविध विषय, अद्ययावत नोंदवह्या, शेतकरी फिडबॅक, सामाजिक व कार्यालयीन अंकेक्षण परीक्षण आदी निकषांच्या आधारे हे मानांकन मिळाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गजानन ननावरे यांनी दिली.

Web Title: Natepute Krishi Mandal office became the top in the state