शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सन्मान योजनेच्या लाभासाठी सोलापूर जिल्ह्यातील बारा लाख शेतकºयांची नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 13:59 IST

सोलापूर : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ शेतकºयांना देण्यात येत आहे.  यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १२ ...

ठळक मुद्देनिधी देण्यासाठी समारंभ : लाभार्थी शेतकºयांचा सन्मान होणारबँक तपशील प्राप्त नसल्याने शेतकºयांना थेट त्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा करण्यात अडचणमार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठोस काम दिसण्याची शक्यता

सोलापूर : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ शेतकºयांना देण्यात येत आहे.  यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १२ लाख ३३ हजार शेतकºयांची नावे आली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी उत्तरप्रदेश येथील गोरखपूर येथून शेतकºयांना या सन्मान निधीचे वितरण स्वत: करणार आहेत. त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांना सन्मान योजनेचा लाभ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यात शेतकºयांना या योजनेतून दोन हजार रुपयांचा मदत निधी त्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गतीने कामकाज सुरू केले आहे. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ४ लाख ९९ हजार शेतकरी कुटुंबांना या योजनेसाठी प्राथमिक स्तरावर पात्र ठरविण्यात आले आहे. यापैकी २ लाख १७ हजार शेतकºयांची संपूर्ण माहिती बँक खात्यासह आॅनलाईनवर नोंदविण्यात आली आहे. उर्वरित शेतकºयांची यादी व बँक तपशीलही आठ दिवसात नोंदणी होण्याची शक्यता आहे. 

पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या शेतकºयांना किमान दोन हजार रुपयांचा सन्मान निधी देण्याचा शुभारंभ रविवारी होत आहे. गोरखपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात लाईव्ह करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील होणारा शेतकºयांचा सन्मानही लाईव्ह करण्यात येत आहे. 

निधी जमा करण्यात अडचणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ फेब्रुवारी पर्यंत शेतकºयांना सन्मान योजनेचा लाभ देण्याची भूमिका घेतली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्नही सुरू केले आहेत; मात्र अजूनही बहुतांश शेतकºयांचा बँक तपशील प्राप्त नसल्याने शेतकºयांना थेट त्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा करण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठोस काम दिसण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीShetkari Jagar Manchशेतकरी जागर मंचNarendra Modiनरेंद्र मोदी