सोलापूर : डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले तरी त्यांच्याबद्दलचे गूढ अद्यापही कायम आहे. काय खरं काय खोटं, याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तपास यंत्रणेकडून नेमके मूळ शोधून काढले जावे, अशी भावना सामान्य जनतेमधून उमटू लागली आहे.
डॉक्टरांचा वारंवार अपमान व्हायचा. त्यांनी उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ओपीडीचेच अधिकार होते, ओळखीच्या रुग्णाचे बिल कमी करायला सांगितले तरी ते केले जायचे नाही. त्यांचे रुग्णालयातील अधिकारच कमी केले होते, त्यांच्या शब्दाला किंमत राहिली नव्हती, अशा गोष्टी चर्चिल्या जात आहेत.
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
डाॅ. वळसंगकर, पुत्र आणि सून हे तिघेही न्यूरोसर्जन होते. प्रत्येकजण आपापल्या रुग्णांची बिले स्वत: घ्यायचे. या प्रकरणात अटकेनंतर कारागृहात असलेल्या मनीषाला वेल्फेअरसंदर्भातील निर्णय होते. काही आवश्यक वस्तू लागल्या तर त्या डॉ. शिरीष सरांच्या स्वाक्षरीने मागवले जायचे, अशीही चर्चा आहे.
सुनेला हस्तक्षेप मान्य नव्हता
रुग्णालयातील अधिकार सुनेला दिलेले असतानाही त्यांना डॉक्टरांचा हस्तक्षेप मान्य नव्हता. सून आणि मुलाच्या अंतर्गत कलहाचा हॉस्पिलटवर परिणाम होऊ नये म्हणून डॉ. शिरीष वळसंगकरांचे येणे वाढले होते. हे मुलगा आणि सुनेला मान्य नव्हते यामुळे काही वाद होत होते, अशीही चर्चा सुरू आहे.