शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

"मराठा आरक्षणासाठी माझा जरांगेंना पाठिंबा"; चिठ्ठी लिहून माजी नगरसेवकाची करमाळ्यात आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 14:00 IST

ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. 

करमाळा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने गेल्या वर्षभरापासून आंदोलने सुरू असून सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसल्याच्या निषेधार्थ करमाळ्याचे माजी नगरसेवक बलभीम विष्णू राखुंडे (वय ८०, रा. कानाड गल्ली, करमाळा) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. 

आत्महत्या करण्यापूर्वी तशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. करमाळा शहरातील बलभीम राखुंडे हे मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष असून ते करमाळ्याचे दहा वर्षे नगरसेवक राहिलेले आहेत. सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. राज्यातील अनेक तरुणांनी आत्महत्या करूनही मराठा आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने ते उद्विग्न होते. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या करत आहे. माझी कोणतीही तक्रार नाही मराठा आरक्षणासाठी माझा मनोज जरांगे यांना पाठिंबा आहे अशा आशयाची चिठ्ठी लिहून खाली सही करून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी पहाटे निदर्शनात आले.

करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आवश्यक ती कार्यवाही करून राखुंडे यांचा मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. माजी नगरसेवक बलभीम दादा राखुंडे यांच्या पाठीमागे तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDeathमृत्यूManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील