अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:23 IST2021-05-21T04:23:40+5:302021-05-21T04:23:40+5:30

सांगोला : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पिवळसर लेसने गळा आवळून पत्नीने खून केल्याचा निर्दयी प्रकार सांगोला तालुक्यात ...

Murder by strangulation of husband who is an obstacle in an immoral relationship | अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा गळा आवळून खून

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा गळा आवळून खून

सांगोला : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पिवळसर लेसने गळा आवळून पत्नीने खून केल्याचा निर्दयी प्रकार सांगोला तालुक्यात गावडेवाडी हंगिरगे येथे घडला. हा प्रकार कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून शेजारील लोकांना पती घरात नसल्याचे सांगून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला.

गुरुवार, २० मे रोजी मध्यरात्री १.१५ च्या सुमारास गावडेवाडीत ही घटना घडली. सोपान भीमराव गावडे (३९) असे मृताचे नाव असून पमाबाई सोपान गावडे (वय २४, रा. गावडेवाडी हंगिरगे) असे पत्नीचे नाव आहे. याबाबत दत्तात्रय बाळू गावडे (रा. गावडेवाडी) यांनी फिर्याद दिली.

गावडेवाडी हंगिरगे येथील सोपान भीमराव गावडे यांचे पहिले लग्न झाले होते. परंतु पहिल्या पत्नीचा घटस्फोट झाला होता. सोपान गावडे यांनी सहा वर्षांपूर्वी मारोळी (ता. मंगळवेढा) येथील पमाबाई हिच्या सोबत दुसरा विवाह केला होता. सोपान हे मजुरी करून कुटुंबाची उपजीविका भागवित होते.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, पमाबाईचादेखील हा दुसरा विवाह होता. ती पती सोपान याच्यासमवेत वारंवार तक्रार करून माहेरी निघून जायची. घरी त्यास जेवण देत नव्हती. सोपान हा सरळमार्गी असूनही ती सतत वाद घालून त्रास देत होती. तिची वागणूकही वाईट होती. गावातील किराणा दुकानदार मारुती चौगुले याच्याशी तिचे अनैतिक संबंध होते. पती सोपान हा त्याला विरोध करीत होता. त्यामुळे ती पतीवर चिडून होती.

गुरुवारी मध्यरात्री १.१५च्या सुमारास घरी पती सोपान गावडे याचा पिवळ्या रंगाच्या लेसने गळा आवळून खून केला. या झटापटीत सोपानच्या अंगावर किरकोळ जखमा झाल्याने रक्त आले. गुप्तांगावर व डोक्याच्या मागील बाजूस जखम झाल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास आले. तसेच पमाबाईची एक चप्पल सोपानच्या छातीजवळ तर दुसरी पायाजवळ आढळली. त्यामुळे खुनाचा संशय बळावला. या घटनेनंतर सुभाष वाघ यांनी सांगोला पोलिसांना याची माहिती दिली.

---

...अन् शेजारी डोकावले

घटनेदिवशी गुरुवारी मध्यरात्री १.३९ च्या सुमारास २०० फूट अंतरावर शेजारी राहणारे मंगल लक्ष्मण मेटकरी व शोभा पांडुरंग गावडे यांना सोपान गावडे यांच्या घरातून लहान मुलीच्या रडण्याचा, पाय आपटण्याचा व घशाचा आवाज येत होता. शेजाऱ्यांना संशय आल्याने पहाटे ते सोपानच्या घरी डोकावले. पमाबाईस सोपान कोठे आहे? अशी विचारणा केली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला.

Web Title: Murder by strangulation of husband who is an obstacle in an immoral relationship