डोक्यात दगड घालून केला खून; पंढरपूर शहरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 11:02 IST2019-11-22T10:21:20+5:302019-11-22T11:02:01+5:30
खून झालेल्या इसमाचे नाव व पत्ता पोलिसांना अद्याप कळलेले नाही.

डोक्यात दगड घालून केला खून; पंढरपूर शहरातील घटना
पंढरपूर : पंढरपूर शहरांमधील मध्यवर्ती ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी दहा वाजता उघड झाला आहे.
पंढरपूर येथील स्टेशन रोडवरील तुती रेशीम उत्पादन कथा कोष खरेदी कक्ष तथा खादी ग्रामउद्योग त्याठिकाणी गुरुवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. ही घटना पोलीस प्रशासनाला शुक्रवारी सकाळी दहा वाजता समजली़ त्यानंतर तत्काळ पोलिस अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र खून झालेल्या इसमाचे नाव व पत्ता पोलिसांना अद्याप कळलेले नाही. खून झाल्याची माहिती मिळताच पंढरपूर शहरातील नागरिकांनी खादी ग्रामोद्योग परिसरात गर्दी केली होती.