उसने पैसे मागण्यावरून वृद्धाच्या अंगावर थयथय नाचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:25 IST2021-05-25T04:25:42+5:302021-05-25T04:25:42+5:30

२३ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास दत्तात्रय दिगंबर कदम हा फिर्यादीच्या मोटारसायकलवरून येऊन त्याच्या हातातील कोयता व्हरांड्याच्या भिंतीजवळ ...

Murder by dancing on the body of an old man for asking for money | उसने पैसे मागण्यावरून वृद्धाच्या अंगावर थयथय नाचून खून

उसने पैसे मागण्यावरून वृद्धाच्या अंगावर थयथय नाचून खून

२३ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास दत्तात्रय दिगंबर कदम हा फिर्यादीच्या मोटारसायकलवरून येऊन त्याच्या हातातील कोयता व्हरांड्याच्या भिंतीजवळ ठेवून फिर्यादीस तू माझी मुलगी राणुला आठ दिवसांपूर्वी काय म्हणाला असे विचारून शिवीगाळ केली तसेच हाताने मानगुटीवर मारत असताना दुसऱ्या मोटारसायकलवरून सीताराम दत्तात्रय कदम, सागर प्रकाश कदम, प्रशांत ऊर्फ भय्या शंकर लवळे यांनी येऊन शिवीगाळ करून फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी दत्तात्रय कदम, सीताराम कदम व प्रशांत ऊर्फ भैय्या लवळे यांनी माझे वडील अंबादास एकनाथ रोकडे यांच्या अंगात लय कळ आहे, असे म्हणून वडिलांच्या अंगावर नाचून त्यांना जीवे ठार मारल्याची फिर्याद वैजीनाथ रोकडे यांनी दिली. यावरून पोलिसांनी दत्तात्रय दिगंबर कदम, सीताराम दत्तात्रय कदम, सागर प्रकाश कदम, प्रशांत ऊर्फ भैय्या शंकर लवळे, नागनाथ अंबादास रोकडे, राणू नागनाथ रोकडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे करत आहेत.

Web Title: Murder by dancing on the body of an old man for asking for money