दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेचं शटडाउन; जुळे सोलापुरातील पाणीपुरवठा विस्कळीत
By Appasaheb.patil | Updated: August 13, 2023 19:17 IST2023-08-13T19:17:59+5:302023-08-13T19:17:59+5:30
दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेने १३ ऑगस्ट २०२३ रोजी एकदिवसाचा शटडाउन घेतला होता.

दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेचं शटडाउन; जुळे सोलापुरातील पाणीपुरवठा विस्कळीत
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेने १३ ऑगस्ट २०२३ रोजी एकदिवसाचा शटडाउन घेतला होता. त्यामुळे विजापूर रोड, जुळे सोलापूर, सैफुल, हत्तुरे वसतिसह अन्य महत्त्वाच्या नगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून पुढील दोन दिवस या भागातील पाणीपुरवठा आणखीन विस्कळीत होणार असल्याचे महापालिकेने सांगितले.
पाणीपुरवठा विभागाकडील टाकळी हेड वर्क्स येथील पंपहाउसजवळ मेन १२०० एमएम पाइपलाइन गळती सुरू झाली आहे. याबाबतची माहिती पाणीपुरवठा विभागास मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या पाहणीनंतर गळती बंद करण्यासाठी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १३ ऑगस्ट रोजी दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, १३ ऑगस्टनंतर १४ ऑगस्ट रोजी एक रोटेशन शहरातील पाणीपुरवठा पुढे जाणार आहे. शिवाय काही भागात उशिराने, कमी वेळेने व कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केेले आहे.