शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

मुंबईच्या दांडियात माळीनगरातील पारध्यांच्या टिपऱ्या, शोधला आत्मसन्मानाचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 11:15 PM

पालावरचे जीवन जगणा-या पारध्यांच्या आयुष्याला सुखाची किनार कधी येईल, असा प्रश्न नेहमीच विचारला जात असला तरी सुखाच्या मृगजळाच्या मागे न धावता अकलूज तालुक्यातील माळीनगरमधील संग्रामनगर येथील नऊ पारधी कुटुंबांनी आत्मसन्मानाचा मार्ग शोधला आहे.

गोपालकृष्ण मांडवकरसोलापूर : पालावरचे जीवन जगणा-या पारध्यांच्या आयुष्याला सुखाची किनार कधी येईल, असा प्रश्न नेहमीच विचारला जात असला तरी सुखाच्या मृगजळाच्या मागे न धावता अकलूज तालुक्यातील माळीनगरमधील संग्रामनगर येथील नऊ पारधी कुटुंबांनी आत्मसन्मानाचा मार्ग शोधला आहे. नवरात्रात मुंबईतील गारबा आणि दांडियासाठी तिथे जाऊन टिपºया तयार करण्याचा आणि तो विकण्याचा अफलातून व्यवसाय या पारध्यांनी सुरू केला आहे.मुंबईतील दादर, व्हीटी, डोंबिवली, भायखळा या भागामध्ये या पारधी कुटुंबांचा व्यवसाय सध्या जोर धरत आहे. फूटपाथलगत किंवा एखाद्या इमारतीच्या आश्रयाने राहून तिथेच टिप-या तयार करण्याचा उद्योग ते करीत आहेत. फूटपाथवर किंवा स्टेशनवर या टिपºया विकून त्यातून पैसा कमविणाºया या पारध्यांची धडपड लक्षवेधी ठरावी, अशीच आहे.संग्रामनगरातील गौराबाई पवार, तिचा विवाहित मुलगा किसन पवार, सुरेश चव्हाण, दत्तू चव्हाण, बापू पवार, लाला चव्हाण, गोपाल पवार, अंबादास पवार आणि शिवा पवार या नऊ जणांचे कुटुंब गेल्या १५ दिवसांपासून गावातील घरांना कुलूप लावून मुंबईत राबत आहेत. हे कुटुंब मुंबईतील व्यापाºयाकडून ३०० ते ४०० रुपयात एक बंडल या भावाने बेलाच्या काठ्या विकत घेतात. चमकी, झिल्ली, पेस्ट खरेदी करून त्यापासून सुंदर टिपºया तयार करतात. नंतर त्यांची विक्री १० ते २० रुपये जोडी या भावाने करतात. या नऊ दिवसांच्या सीझनमध्ये एक कुटुंब २० ते २५ हजार रुपयांची कमाई करते. नवरात्र संपले की त्याच पैशातून मुंबईच्या ठोक बाजारातून फुगे, खेळणी खरेदी करायची आणि अकलूजमध्ये परत येऊन कुटुंबातील महिलांच्या माध्यमातून बाजाराच्या दिवशी परिसरातील खेड्यांमध्ये किंवा यात्रांमध्ये त्याची चिल्लर विक्री करायची, असा त्यांचा व्यवसाय आहे. मागील १५ वर्षांपासून या कुटुंबाचा हा व्यवसाय सुरू आहे.............................मिरची, लिंबाचाही व्यापारकेवळ दांडिया विकण्याचाच नव्हे; तर मुंबईत जाऊन लिंबू, मिरच्या विकण्याचा व्यवसायही हे पारधी कुटुंब करतात. अकलूजच्या बाजारातून दर गुरुवारी लिंबू-मिरचीची खरेदी करायची. शुक्रवारी रेल्वेने मुंबई गाठायची. दुस-या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी मुंबईच्या बाजारात त्याची विक्री करायची आणि त्याच रात्री किंवा सकाळी रेल्वेने परत यायचे. पुन्हा गुरुवारी तोच क्रम, अशी त्यांची व्यवसायाची पद्धत आहे. बेरोजगारीच्या नावाने सरकारला दोष देण्यापेक्षा किंवा कुणापुढे हात पसरण्यापेक्षा त्यांनी निवडलेला हा आत्मसन्मानाचा मार्ग कौतुकास्पद असाच आहे.