मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी वंदे भारत दहा फेब्रुवारीला धावणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन 

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: January 29, 2023 17:20 IST2023-01-29T17:20:17+5:302023-01-29T17:20:42+5:30

मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी वंदे भारत दहा फेब्रुवारीला धावणार आहे. 

 Mumbai-Solapur, Mumbai-Shirdi Vande Bharat will run on February 10   | मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी वंदे भारत दहा फेब्रुवारीला धावणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन 

मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी वंदे भारत दहा फेब्रुवारीला धावणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन 

सोलापूर : महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. दहा फेब्रुवारी रोजी दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत होणार आहे. मुंबई ते सोलापूर तसेच मुंबई ते साईनगर अर्थात शिर्डीकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. 

याबाबत मध्य रेल्वेच्या कार्यालयाकडून प्राथमिक माहिती मिळाली असून त्याचे नियोजन सुरू आहे. तुर्त आम्हाला टेलिफोनवरून मेसेज मिळाला असून सोमवारी, ३० जानेवारी रोजी याबाबत बैठक होईल. बैठकीत या दोन नवीन गाड्यांचे टाईमटेबल ठरणार आहे. त्यानंतर पुढील माहिती देऊ, अशी माहिती सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रनावयले यांनी दिली आहे. 


 

Web Title:  Mumbai-Solapur, Mumbai-Shirdi Vande Bharat will run on February 10