हायवेवर वाहनचालकांनी दिली मृत्युंजय दूतची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:23 IST2021-09-18T04:23:41+5:302021-09-18T04:23:41+5:30
अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महामार्ग पोलीस प्रादेशिक विभागाचे पोलीस अधिक्षक संजय जाधव, पोलीस उपअधीक्षक ...

हायवेवर वाहनचालकांनी दिली मृत्युंजय दूतची माहिती
अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महामार्ग पोलीस प्रादेशिक विभागाचे पोलीस अधिक्षक संजय जाधव, पोलीस उपअधीक्षक प्रितम यावलकर साहेब, पोलीस निरीक्षक सस्ते, वेलापुरे यांचे मार्गदर्शनखाली चालक दिनानिमित्त महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सॅनिटॉयझर, मास्कचे वाटप व खाद्यपदार्थ, फळे व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. यावेळी हायवेचे डॉ. महेंद्र ताकतोडे यांनी वाहन चालवताना आवश्यक आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. तसेच वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देऊन प्रबोधन करण्यात आले व मृत्युंजय दूत संकल्पना व स्व.बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची माहिती देण्यात आली.
..........
फोटो ओळी : वरवडे टोल नाका येथे महामार्ग पोलीस मदत केंद्राच्यावतीने वाहन चालकांना गुलाब पुष्प देताना पोलीस निरिक्षक सस्ते, वेलापवुरे, डॉ. महेंद्र ताकतोडे.
.......
फोटो : १७मोडनिंब