शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
3
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
4
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
5
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
6
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
7
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
8
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
9
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
10
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
11
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
12
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
13
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
14
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
15
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
20
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
Daily Top 2Weekly Top 5

खासदार, आमदारही देणार मागासवर्गीय आयोगाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 17:00 IST

मराठा आरक्षण जनसुनावणी, सोलापूरातील सकल समाजाने केली विनंती

ठळक मुद्देजनसुनावणीवेळी प्रचंड गर्दी होणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज संगमेश्वर महाविद्यालयाच्या प्रांगणात वाहनतळासाठी व्यवस्था जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात विशेष बैठक घेऊन नियोजन केले

सोलापूर : मराठा आरक्षणासंदर्भात होणाºया जनसुनावणीवेळी विविध सामाजिक संघटनांबरोबरच जिल्ह्यातील दोन खासदार आणि सर्व आमदारांच्या वतीने राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, जनसुनावणीवेळी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात विशेष बैठक घेऊन नियोजन केले आहे. 

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाच्या वतीने शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात जनसुनावणी होणार आहे. आयोगाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, प्रा. राजाभाऊ करपे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवेदन स्वीकारणार आहेत. यासंदर्भात सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, दत्तामामा मुळे, राजू सुपाते, राजन जाधव, प्रा. गणेश देशमुख, रवी मोहिते आदींनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार दिलीप सोपल, आमदार भारत भालके यांची भेट घेतली. जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींनाही संपर्क केला. आयोगासमोर आपणही आपले निवेदन सादर करावे, अशी विनंती त्यांनी केली. जिल्ह्यातील सर्व आमदार, माजी आमदार निवेदन सादर करणार असल्याचे समन्वयकांकडून सांगण्यात आले. 

शुक्रवारी मुंबईमध्ये साखर कारखान्याच्या प्रश्नासंदर्भात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे काही लोक मुंबईच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

‘संगमेश्वर’च्या मैदानावर वाहनतळ- शुक्रवारी होणाºया जनसुनावणीवेळी प्रचंड गर्दी होणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, आरोग्य विभाग, समाजकल्याण विभाग अशा विविध विभागांची बैठक घेतली. बांधकाम विभागाने विश्रामगृह परिसरात सावलीसाठी मंडप टाकावा. महापालिकेने पिण्याच्या पाण्याची सोय करावी. अ‍ॅम्ब्युलन्स तैनात ठेवावी आदी सूचना केल्या. संगमेश्वर महाविद्यालयाच्या प्रांगणात वाहनतळासाठी व्यवस्था करण्यात आल्याचे तेली यांनी सांगितले. आयोगासमोर ज्या व्यक्ती, संस्था, संघटना यांना मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणासंबंधी निवेदन सादर करायचे आहे किंवा म्हणणे मांडायचे आहे त्यांनी लेखी पुरावे आणि ऐतिहासिक दस्तऐवजांसह आयोगासमोर म्हणणे मांडण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सरकारची भूमिका आहे. आयोगासमोर समाजाच्या विविध घटकांच्या व्यथा पोहोचाव्यात यासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोत. त्यादृष्टीने विविध घटकांशी संपर्कही करण्यात आला आहे.- शहाजी पवार, भाजपा, जिल्हाध्यक्ष

टॅग्स :SolapurसोलापूरmarathaमराठाSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस