१२ दिवसात चौघांच्या मृत्यूमुळे शेरजाळे कुटुंबावर शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:20 IST2021-05-24T04:20:57+5:302021-05-24T04:20:57+5:30
सोलापूर : कोरोनासारखी लक्षणे असतानाही अंगावर दुखणे काढल्याने घरजावई वारला. त्यानंतर वडील नानासाहेब, वडिलापाठोपाठ भाऊ नानासाहेब कोरोनावर ...

१२ दिवसात चौघांच्या मृत्यूमुळे शेरजाळे कुटुंबावर शोककळा
सोलापूर : कोरोनासारखी लक्षणे असतानाही अंगावर दुखणे काढल्याने घरजावई वारला. त्यानंतर वडील नानासाहेब, वडिलापाठोपाठ भाऊ नानासाहेब कोरोनावर उपचार सुरू असताना व त्यानंतर आईचे वृद्धापकाळाने निधन झाले. रानमसले येथे अवघ्या १२ दिवसात चार व्यक्तींचा मृत्यू झाल्याने शेरजाळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावात १५ लोक कोरोनाचे शिकार झाले आहेत. त्यामध्ये शेरजाळे कुटुंबालाही धक्का बसला आहे.
प्रकाश शेरजाळे यांना मुलगा नसल्याने मुलगी व जावई सूर्यकांत भडोळे रानमसलेत शेरजाळे यांच्याकडेच राहतात. कोरोनासारखा आजार जावई प्रकाश यांना होता. मात्र तपासणी व उपचार केला नाही. त्रास वाढल्यानंतर दवाखान्याला घेऊन जात असताना वाटेतच सूर्यकांतचा मृत्यू झाला. नातजावई गेल्याने नात विधवा झाली. त्यातच दुसरा मुलगा नानासाहेब व सून कोरोनामुळे दवाखान्यात उपचार घेत होती. याचा धक्का बसल्याने प्रकाश व नानासाहेबांचे वडील बाबूराव शेरजाळेंचा मृत्यू झाला. त्यानंतर उपचार सुरू असलेल्या नानासाहेबांचाही मृत्यू झाला. सून मात्र बरी होऊन घरी आली. हे सर्व सहन न झाल्याने नानासाहेबांची आई कस्तुराबाईंचाही मृत्यू झाला. अवघ्या १२ दिवसात चौघांचा मृत्यू झाल्याने रानमसले येथील शेरजाळे कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
---
१५ लोकांचा कोरोनाने घेतला बळी
एक मे रोजी प्रकाश शेरजाळे यांचे जावई सूर्यकांत भडोळे, ३ मे रोजी वडील बाबूराव ( वृद्धापकाळाने), ७ मे रोजी भाऊ नानासाहेब तर १२ मे रोजी आई कस्तुराबाईंचा देवाघरी गेल्या. रानमसलेत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्याच्या संख्येत कौसर शेख यांच्या निधनामुळे भर पडली आहे. आता १५ लोक कोरोनाचे बळी ठरले असल्याचे गावकरी सांगतात.