सोलापूर : नाथाच्या अपघाती मृत्यूमुळे सोलापूरच्या जोशी गल्लीवर शोककळा!

By रवींद्र देशमुख | Updated: March 26, 2023 17:27 IST2023-03-26T17:26:43+5:302023-03-26T17:27:04+5:30

अपघाती मृत्यूमुळे सोलापूरच्या गावठाण भागावर शोककळा पसरली आहे.

Mourning at Joshi Galli of Solapur due to Nath's accidental death! | सोलापूर : नाथाच्या अपघाती मृत्यूमुळे सोलापूरच्या जोशी गल्लीवर शोककळा!

सोलापूर : नाथाच्या अपघाती मृत्यूमुळे सोलापूरच्या जोशी गल्लीवर शोककळा!

सोलापूर पौरोहित्यामध्ये विद्वान असलेले, वेद आणि पुराणाचे ज्ञानी तसेच सोलापूरचे ग्रामजोशी जयवंत उर्फ नाथा जोशी (वय 40, रा. उत्तर कसबा) या तरुण पुरोहितच्या अपघाती मृत्यूमुळे सोलापूरच्या गावठाण भागावर शोककळा पसरली आहे.

शनिवारी रात्री साडेनऊ वाजता बसवकल्याणजवळील सस्तापुर चौरस्त्यावर जोशी कुटुंबीयांच्या कारला ट्रकने धडक दिली. यामध्ये नाथांचा मृत्यू झाला. कुटुंबातील सहा जण गंभीर जखमी झाले. 

जोशी कुटुंबीय हे देवदर्शनासाठी तांडूर (कर्नाटक) गेले होते. परत येताना हैदराबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बसवकल्याण येथे डिझेल भरून पंपातून गाडी रस्त्यावर येत असताना पाठीमागून येणारा भरधाव वेगातील ट्रकने जोराची धडक दिली.

जखमींवर सोलापुरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जयवंत (नाथा) जोशी यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्यावर जुना पुना नाका येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Mourning at Joshi Galli of Solapur due to Nath's accidental death!