डोंगरे पिता-पुत्रांची राजकीय मोर्चेबांधणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:26 IST2021-08-12T04:26:13+5:302021-08-12T04:26:13+5:30

मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागातील राजकीयदृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कामती खुर्द येथे सभापती विजयराज यांच्या सन्मानार्थ आयोजित रक्तदान शिबिराला डोंगरे पिता-पुत्रांनी ...

Mountain father-son political front begins | डोंगरे पिता-पुत्रांची राजकीय मोर्चेबांधणी सुरू

डोंगरे पिता-पुत्रांची राजकीय मोर्चेबांधणी सुरू

मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागातील राजकीयदृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कामती खुर्द येथे सभापती विजयराज यांच्या सन्मानार्थ आयोजित रक्तदान शिबिराला डोंगरे पिता-पुत्रांनी हजेरी लावत जणू आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मनोहर डोंगरे यांनी यावेळी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष पाटील यांच्या घरी जाऊन चहापाण्याने बेरजेचे राजकारणही केले. डोंगरे यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले दूध संघाचे संचालक दीपक माळी हे माजी आमदार राजन पाटील यांच्या गोटात दाखल झाले होते. त्यांच्या गावात विजयराज यांचा मोठा कार्यक्रम घेऊन एकप्रकारे आगामी राजकारणाची दिशाच दाखवून दिली आहे, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

----

जनतेला विकास काय माहिती नव्हते

यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर टीका करताना, आजपर्यंत पाटील आमदार असताना रस्ते विकास काय असतो हे मोहोळ तालुक्यातील जनतेला माहीतच नव्हते, स्पष्ट केले.

----

Web Title: Mountain father-son political front begins