चौदा चाकी मालट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

By संताजी शिंदे | Updated: March 25, 2024 18:50 IST2024-03-25T18:50:33+5:302024-03-25T18:50:55+5:30

मालट्रकने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. या प्रकरणी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात चालका विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Motorcyclist killed in collision with 14-wheeler goods truck | चौदा चाकी मालट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

चौदा चाकी मालट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

कुर्डूवाडी : कुर्डूवाडीकडून टेंभुर्णीच्या दिशेने भरधाव वेगाने चाललेल्या चौदा चाकी मालट्रकने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. या प्रकरणी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात चालका विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोपट महादेव अनंतकवळस (वय ४७ रा. कुर्डू ता.माढा) असे ठार झालेल्याचे नाव आहे. रविवारी सायंकाळी ७.३० ते ७.४० वाजण्याच्या दरम्यान पोपट अनंतकवळस हे मोटारसायकल (क्र.एमएच-४५ जी-३७६९) वर बसून कुर्डू येथील एका हॉटेल समोरून जात होते. दरम्यान कुर्डूवाडीकडून टेंभूर्णीच्या दिशेने जाणाऱ्या मालट्रक (क्र.एमएच-३४ बीजी-९९४७) ने पाठीमागून जोरात धडक दिली. धडके दिल्यानंतर मालट्रक चालक जागेवर न थांबता तेथून वाहनासह पळून गेला, हा प्रकार तेथील लोकांनी पाहिला. लोकांनी सात किलो मिटर पर्यंत मालट्रकचा पाठलाग करून अंबड येथील टॉवरलाईन जवळ पकडले.

लोकांनी चालकाला धरले तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी मयत पोपट अनंतकळवस यांचा मुलगा पोपट महादेव अनंतकवळस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालट्रकचालक चंद्रशेखर अरूण नगराळे (रा. बल्लारपूर जि. चंद्रपूर) याच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Motorcyclist killed in collision with 14-wheeler goods truck