सासू-सास-यांनी सुनेला गळफास देऊन जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 04:23 IST2017-12-10T04:22:54+5:302017-12-10T04:23:06+5:30

मुलाने मावसबहिणीशी प्रेमविवाह केल्याने नाराज झालेल्या आई-वडिलांनी नवविवाहित सुनेचा गळफास देऊन खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात जाळण्याचा प्रयत्न केला.

 The mother-in-law burned her with a stroke | सासू-सास-यांनी सुनेला गळफास देऊन जाळले

सासू-सास-यांनी सुनेला गळफास देऊन जाळले

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहोळ (जि. सोलापूर) : मुलाने मावसबहिणीशी प्रेमविवाह केल्याने नाराज झालेल्या आई-वडिलांनी नवविवाहित सुनेचा गळफास देऊन खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना येवती येथील काळे वस्ती येथे घडली. रेखा श्रीकृष्ण लेंडवे (१८, रा. येवती, काळे वस्ती, मोहोळ) असे खून झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
श्रीकृष्ण सुभाष लेंडवे हा पंजाबमधील पठाणकोट येथे सैन्य दलात कार्यरत आहे. त्याचे रेखाबरोबर प्रेमसंबंध जुळाले. दोन महिन्यांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला. त्यानंतर रेखा ही माहेरी राहत होती. पती श्रीकृष्ण पठाणकोट येथे ड्युटीवर निघून गेला.
तीन-चार दिवसांपूर्वी श्रीकृष्णने पत्नी रेखा हिला येवती येथे घरी जाण्यास सांगितले. रेखाच्या वडिलांनी तिला ६ डिसेंबर रोजी सासरी आणून सोडले. श्रीकृष्ण आणि रेखा यांचे मावस बहीण-भावाचे नाते लागत असताना दोघांनी लग्न केल्याचा राग श्रीकृष्णचे वडील सुभाष लेंडवे व आई जनाबाई यांना होता. त्यातूनच त्यांनी प्रशांत लेंडवे याची मदत घेऊन रेखाला घरातच फास लावून ठार केले. ती जिवंत असल्याची शंका आल्यावर घरातच तिला पेटवून दिले. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात नेऊन पेटवून दिला.

...म्हणून गवत पेटवले

रेखाला शेतात जाळण्यासाठी नेताना तिचे तारेने हात बांधले होते. शिवाय तिला जाळताना परिसरातील लोकांना संशय येऊ नये म्हणून तिला जाळताना परिसरातील गवत पेटवून दिले होते.

Web Title:  The mother-in-law burned her with a stroke

टॅग्स :Murderखून