जितके पैसे जमा तितकीच वीज वापरता येणार; आता घराघरात स्मार्ट मीटर बसविणार

By Appasaheb.patil | Published: July 24, 2021 01:14 PM2021-07-24T13:14:53+5:302021-07-24T13:15:07+5:30

घरात स्मार्ट मीटर बसविणार : बिलांच्या तक्रारीवर तोडगा; ग्राहकांना दिलासा

The more money collected, the more electricity can be used; Now we will install smart meters in every house | जितके पैसे जमा तितकीच वीज वापरता येणार; आता घराघरात स्मार्ट मीटर बसविणार

जितके पैसे जमा तितकीच वीज वापरता येणार; आता घराघरात स्मार्ट मीटर बसविणार

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील

सोलापूर - घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रीडिंग बाबतच्या विविध तक्रारींवर ऊर्जा विभागाने तोडगा काढला असून घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रीपेड मीटरमध्ये जितके पैसे जमा तितकीच वीज आता ग्राहकांना वापरता येणार आहे. वीज वापरानुसारच ग्राहकांना बिल येणार आहे.

दरम्यान, महावितरणने वीजचोरीस आळा, विजेचा काटकसरीने वापर, वीजबिलांसोबत चुकीच्या रीडिंग पद्धतीला आळा बसविण्यासाठी महावितरणने मोठे पाऊल उचलले आहे. लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. या मीटरमुळे दूरस्थ पद्धतीने माहितीची देवाणघेवाण आणि वीजभाराचे व्यवस्थापन अगदी कमीतकमी वेळेत करता येणार आहे. बाहेरगावी असाल तरी ग्राहकांना मीटर चालू किंवा बंद करता येणार आहे. त्यामुळे वीज खर्चावर नियंत्रण असणार आहे.

लवकरच निघणार निविदा

राज्यात लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. नव्या स्मार्ट मीटरसाठी निविदा प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. निविदा कशी काढायची याबाबत केंद्र सरकारनेही काही निर्देश राज्याला जारी केले आहेत. याबाबत मंत्रालयात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बैठकही घेतल्याने महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले.

हे आहेत स्मार्ट मीटरचे फायदे

मोबाईलच्या सीमकार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रुपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असतील. यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल. वीज वापरानुसारच बिल येईल तसेच प्रीपेड मीटरमध्ये तर जितके पैसे जमा आहेत त्यानुसारच वीज वापरता येईल.

परिणामी विजेची बचत होण्यास यामुळे फायदा होईल. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल बिनचूक दिले जाणार आहे. मीटरमध्ये छेडखानी करून कुणी वीज चोरीचा प्रयत्न करीत असेल तर त्याची कल्पना मुख्यालयाला लगेच येऊन ती रोखणे शक्य होणार आहे.

जानेवारी महिन्यात सोलापूर जिल्ह्यात अंमलबजावणी होणार

मुंबई महानगर परिसर, नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या महानगरात प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असून साधारण- जानेवारी महिन्यात सोलापूर शहरासोबत संपूर्ण जिल्ह्यात मीटर बसविण्याच्या कामाला प्रारंभ होईल असा अंदाज महावितरणच्या सोलापूर मंडल कार्यालयाने वर्तविला आहे.

Web Title: The more money collected, the more electricity can be used; Now we will install smart meters in every house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.