इंद्रभुवन अन् महापालिका आवारात झळकणार सिद्धेश्वर यात्रेची क्षणचित्रे
By Appasaheb.patil | Updated: January 4, 2023 14:30 IST2023-01-04T14:29:39+5:302023-01-04T14:30:46+5:30
शहराची सांस्कृतिक ओळख दिसणार; दालने, स्वागतिका परिसरही खुलणार

इंद्रभुवन अन् महापालिका आवारात झळकणार सिद्धेश्वर यात्रेची क्षणचित्रे
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट या देशपातळीवरील संस्थेच्या माध्यमातून महापालिकेच्या इंद्रभुवन व आवारातील इमारतीमध्ये शहराची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा दर्शविणारी छायाचित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत.स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इंद्रभुवन इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीत शहराची सांस्कृतिक ओळख दिसणारी क्षत्रचित्रे असणार आहेत. त्याअंतर्गत ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील ठळक घडामोडी छायाचित्रांच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न आर्किटेक्ट शशिकांत चिंचोळी यांच्या कल्पनेतून करण्यात आला आहे. यासाठी जवळपास चाळीस क्षणचित्रे निवडण्यात आली असून, मंगळवारी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते चित्राचे अनावरण करण्यात करून महापलिकेकडे सुपुर्द करण्यात आले.यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, आर्कि. शशिकांत चिंचोळी, मनोज मर्दा, प्रशांत सिंगी, केदार बिराजदार, राहुल खमितकर, चंदूलाल अंबाल, यादगिरी कोंडा, निंबाळे, ऋषिकेश पाटील, श्रीधर पागूल, विरल उदेशी उपस्थित होते.
सर्वसाधारण सभेत दिली होती मान्यता
महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ च्या सर्वसाधारण सभेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट या संस्थेस तशी मान्यता देण्यात आली आहे. शहराची सांस्कृतिक ओळख दर्शविणारी ही छायाचित्रे महापालिका आवारातील वेगवेगळ्या इमारतीतील दालने आणि स्वागतिका परिसरात झळकणार आहेत.