सोलापुरात दहा वर्षाच्या मुलीशी अश्लिल चाळे; विचाारणा करणाऱ्या ठार मारण्याची धमकी
By विलास जळकोटकर | Updated: November 27, 2023 17:03 IST2023-11-27T17:01:36+5:302023-11-27T17:03:13+5:30
बालकास ताब्यात घेतले : अन्य दोघांना अटक.

सोलापुरात दहा वर्षाच्या मुलीशी अश्लिल चाळे; विचाारणा करणाऱ्या ठार मारण्याची धमकी
विलास जळकोटकर, सोलापूर : दहा वर्षाच्या मुलीला गाठून तिच्याशी अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न शहरातील एका परिसरात घडल्याची तक्रार पिडितेच्या वडिलांनी पोलिसात दिली. जाब विचारण्यासाठी गेले असता शिवीगाळ करुन पोलिसात तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारी म्हटले आहे. या प्रकरणी रविवारी एका विधिसंघर्ष बालकास ताब्यात घेतले असून, अन्य दोघांना अटक केली आहे. विनयभंग व बाललैंगिक छळाचा गुन्हा नोंदला आहे.
पिडितेच्या वडिलांनी तक्रारी म्हटले आहे की, पिडित दहा वर्षाची मुलगी रात्री आठच्या सुमारास प्रार्थनेसाठी निघाली होती तेव्हा एका मुलानं तिचा हात धरुन असभ्य वर्तन केले. पिडितेच्या वडिलांनी जाब विचारण्यासाठी गेले असता विजय व बजरंग गायकवाड यांनी पिडितेच्या वडिलाला शिवीगाळ करुन पोलिसात तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी सपोनि शेख तपास करीत आहेत.