अक्कलकोटमध्ये मोकाट वावर.. कोरोनाला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:12 IST2021-03-30T04:12:30+5:302021-03-30T04:12:30+5:30

सोमवारी दिवसभर जुना अडत बाजार येथे भाजीपाला खरेदीसाठी तालुक्यातील नागरिकांनी एकच गर्दी केली. यामध्ये अनेकांनी तोंडाला ना मास्क, ना ...

Mokat Wawar in Akkalkot .. Invitation to Corona | अक्कलकोटमध्ये मोकाट वावर.. कोरोनाला आमंत्रण

अक्कलकोटमध्ये मोकाट वावर.. कोरोनाला आमंत्रण

सोमवारी दिवसभर जुना अडत बाजार येथे भाजीपाला खरेदीसाठी तालुक्यातील नागरिकांनी एकच गर्दी केली. यामध्ये अनेकांनी तोंडाला ना मास्क, ना शारीरिक अंतर याचे काहीच भान न ठेवता. मोकाटपणे वावरताना दिसून आले. यामुळे शहर व तालुक्यात कोरोना रुग्णवाढीला चालना मिळत आहे. आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांवर नगरपालिका व पोलीस प्रशासनाने लक्ष ठेवून कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारचे आदेश व सूचना दिल्या आहेत. याकडे नगरपालिका, पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

चौकट:-

अक्कलकोट तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात असलीतरी अशीच मोकाट स्थिती राहिल्यास, येत्या काही दिवसात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना लस देणे व उपचार करणे याबाबतीत सुट्टीच्या दिवशी तारांबळ उडाली. दोन दिवसात सुटीच्या दिवशी लस नसल्याने देणे बंद केले आहे.

२९अक्कलकोट-बाजार

अक्कलकोट येथील आठवडा भाजीपाला बाजारात नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. तसेच तोंडाला मास्क न लावता एक ७० वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती भाजी विक्री करताना दिसत आहे.

Web Title: Mokat Wawar in Akkalkot .. Invitation to Corona