शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; मोदींच्या पुणे दौºयामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या विमानाचे उड्डाण रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:29 IST

तांत्रिक अडचणीचा दावा : घाईघाईत भाषण संपवूनही सोलापुरात करावा लागला मुक्काम

ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौºयामुळे पुणे विमानतळावर विशेष दक्षता होतीविमानतळावर गुरुवारी क्लाऊड सिडींगची तीन विमाने, शिंदे यांचे एक विमान आणि चार हेलिकॉप्टर्स थांबून होते

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौºयामुळे गुरुवारी सायंकाळी सोलापुरातून पुण्याला होणारी उड्डाणे रोखण्यात आली. त्याचा फटका काँगे्रसचे राष्ट्रीय नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह चार नेत्यांना बसला. शिंदे यांना  सोलापुरातच मुक्काम करावा लागला. गुरुवारी रात्री होटगी रोडवरील विमानतळावर शिंदे यांच्या विमानासह इतर चार हेलिकॉप्टर मुक्कामी होते. 

ज्योतिरादित्य शिंदे यांची गुरुवारी लातूर, सोलापूर आणि पुण्यात सभा आयोजित करण्यात आली होती. लातूरमध्ये शिंदे यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. लातूरची सभा संपायला उशीर झाला. नियोजित कार्यक्रमानुसार शिंदे यांनी सोलापुरात दुपारी ३.३० पर्यंत येणे अपेक्षित होते. त्यांना पोहोचायला सायंकाळचे साडेपाच वाजले. अंधार होण्यापूर्वीच त्यांनी विमानतळावर परतणे अपेक्षित होते. सायंकाळी साडेपाच पावणेसहाच्या सुमाराला शिंदे आणि ज्योतिरादित्य शिंदे  यांचा ताफा कर्णिक नगरला पोहोचला. येथे अवघ्या चार मिनिटात शिंदे यांनी भाषण केले. पुन्हा त्यांचा ताफा विमानतळावर वेळेवर पोहोचला.

पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होती. पुणे विमानतळावर विशेष सुरक्षा होती. शिंदे यांच्या विमानाला पुण्यात उतरण्यास परवानगी देण्यात आली नाही. विमानतळावर काही वेळ थांबून शिंदे परतले. पुण्यातील त्यांच्या सभा रद्द करण्यात आल्या. एका हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला. 

विमानतळावर विशेष दक्षता- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौºयामुळे पुणे विमानतळावर विशेष दक्षता होती. या कारणास्तव शिंदे यांच्या विमानासह इतर हेलिकॉप्टर्सना उड्डाणाची परवानगी देण्यात आली नव्हती. विमानतळावर गुरुवारी क्लाऊड सिडींगची तीन विमाने, शिंदे यांचे एक विमान आणि चार हेलिकॉप्टर्स थांबून होते, असे एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीचे व्यवस्थापक संतोष कौलगी यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीAirportविमानतळ