मोदींमुळे देशाचा विकास खुंटला - सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 03:31 IST2018-03-12T03:31:48+5:302018-03-12T03:31:48+5:30
देशाचा विकास केवळ काँग्रेस पक्षामुळे झाला आहे. सर्वधर्मसमभावाची भावना केवळ काँग्रेस पक्षाने जपली आहे, परंतु जनतेची दिशाभूल करून सत्तेत आलेल्या सरकारने भ्रमनिरास केला आहे.

मोदींमुळे देशाचा विकास खुंटला - सुशीलकुमार शिंदे
चपळगाव (जि. सोलापूर) - देशाचा विकास केवळ काँग्रेस पक्षामुळे झाला आहे. सर्वधर्मसमभावाची भावना केवळ काँग्रेस पक्षाने जपली आहे, परंतु जनतेची दिशाभूल करून सत्तेत आलेल्या सरकारने भ्रमनिरास केला आहे. पंतप्रधान नुसते बोलबच्चनगिरी करत असल्याने देशाच्या विकासावर विपरित परिणाम झाला असून, विकास खुंटला असल्याची टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. अक्कलकोट तालुक्यातील काझीकणबस येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.