शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या हस्ते उर्दू घरचे भूमिपूजन व्हावे; सोलापुरच्या महापौरांनी पाठविले मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 10:26 IST

राकेश कदम सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जानेवारी रोजी शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. या दौºयात पंतप्रधानांच्या ...

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जानेवारी रोजी शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन करणारआता शहर भाजप नेत्यांनी उर्दू घरच्या कामाचा मुद्दाही पुढे केलाज्या जागेवर उर्दू घरचे बांधकाम होणार आहे ती जागा महाराष्ट्र शासनाची

राकेश कदम

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जानेवारी रोजी शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. या दौºयात पंतप्रधानांच्या हस्ते शहरातील बहुचर्चित उर्दू घरच्या कामाचे भूमिपूजनही व्हावे. हा कार्यक्रम झाल्यास संबंधित समाज घटकाचा आपल्याबद्दलचा गैरसमज दूर होण्यास मदत होईल, अशा आशयाचे पत्र भाजपा नेत्या तथा महापौर शोभा बनशेट्टी यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.

मोदींच्या या दौºयात शहर भाजपातील काही नेत्यांनी घेतलेली ही ‘सेक्युलर’ भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ७० मिनिटांच्या सोलापूर दौºयात महापालिकेची चार प्रमुख विकासकामे आणि रे नगर येथील ३० हजार घरकुलांच्या पायाभरणीचा शुभारंभ करणार आहेत. रे नगर येथील प्रकल्प हा भाजपाचे कट्टर विरोधक मानल्या जाणाºया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या पुढाकारातून आकाराला आला. या प्रकल्पाला निधी मंजूर करण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या भूमिपूजनाची तयारी माकप नेत्यांनी दाखविली होती. त्यानुसार हा कार्यक्रमही होत आहे. आता शहर भाजप नेत्यांनी उर्दू घरच्या कामाचा मुद्दाही पुढे केला आहे. 

महापौर बनशेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, शहरातील सिव्हिल हॉस्पिटलसमोरील जागेत (सर्व्हे नं ६१७५) उर्दू घरचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने या कामाला निधी दिला नाही. पण त्याचे भूमिपूजन केले. आपण आणि आपल्या सरकारने या कामासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन-चार दिवसांत वर्क आॅर्डर देण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.

ज्या जागेवर उर्दू घरचे बांधकाम होणार आहे ती जागा महाराष्ट्र शासनाची आहे. या कामाच्या उद्घाटनाचा समावेश आपल्या ९ जानेवारी रोजीच्या दौºयात व्हावा. तसे आदेश आपण जिल्हाधिकाºयांना द्यावेत. उर्दू घरच्या कामाचे भूमिपूजन या कार्यक्रमात झाल्यास आपला पक्ष संबंधित समाज घटकाविरोधात नाही ही भावना जनसामान्यांमध्ये रुजण्यास मदत होईल, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

उर्दू घरची वाटचाल 

  • - राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने उर्दू भाषेचे संवर्धन करण्यासाठी सोलापुरात उर्दू घर बांधण्यास मंजुरी दिली होती. या कामाच्या जागेवरुन सुरुवातीला वाद झाले. हे वाद शमल्यानंतर या कामाच्या आराखड्यात बदल करण्यात आले. सरकारने या कामासाठी सहा कोटी रुपये मंजूर केले. पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू होण्यास विलंब लावण्यात आला. त्यामुळे शहरातील उर्दूप्रेमींनी आंदोलन सुरू केले.
  • - जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यासंदर्भात महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांची बैठक घेऊन अडथळ्यांची शर्यत दूर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली. सध्या या जागेवर महापालिकेचे साहित्य पडलेले आहे. ते हटविण्यात यावे. आम्ही तातडीने काम सुरू करतो, असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार यांनी नगर अभियंता संदीप कारंजे यांना १५ डिसेंबर रोजी पाठविले आहे. 
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी