मोडनिंबच्या लावणी कलावंतांंनी मांडली मंत्री महोदयांकडं कैफियत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:48 IST2021-09-02T04:48:14+5:302021-09-02T04:48:14+5:30
यावेळी संघटनेच्या वतीने संघटनेच्या वतीने लावणी कलावंत वैशाली नगरकर, संगीता बार्शीकर त्यांच्या उपस्थित कलावंतांनी त्यांचा सत्कार केला. वड्डेटीवारांनी कलावंतांच्या ...

मोडनिंबच्या लावणी कलावंतांंनी मांडली मंत्री महोदयांकडं कैफियत
यावेळी संघटनेच्या वतीने संघटनेच्या वतीने लावणी कलावंत वैशाली नगरकर, संगीता बार्शीकर त्यांच्या उपस्थित कलावंतांनी त्यांचा सत्कार केला. वड्डेटीवारांनी कलावंतांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक आयोजित करून न्याय देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी संगीत पार्टी कलावंत व भटक्या विमुक्त कलावंत कोल्हाटी समाज यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन वडेट्टीवार यांना देण्यात आले. यावेळी मोडनिंब येथील सरपंच प्रतिनिधी अनिल शिंदे, उपसरपंच दत्तात्रय सुर्वे, राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस संतोष पाटील, माजी सरपंच चांगदेव वरवडे, ग्रामपंचायत सदस्य समाधान कोळी, अतुल गाडे, प्रतीक मुसळे, चंद्रकांत जाधव कला केंद्राचे मालक किशनराव जाधव, जगन्नाथ घाडगे यांच्यासह कलावंत उपस्थित होते.
----
३१मोडनिंब०१
मोडनिंब येथे मोडनिंब येथे लावणी कलावंतांनी केले स्वागत करताना कलावंत संघटनेचे अरुण मुसळे वैशाली नगरकर आदी कलावंत