मोबाईल मार्केट; स्थानिक खरेदीला ७० तर ऑनलाइनला ३० टक्के पसंती

By appasaheb.patil | Published: October 31, 2020 01:27 PM2020-10-31T13:27:11+5:302020-10-31T13:27:20+5:30

ऑनलाइन शिक्षणामुळे स्मार्टफोनच्या किमतीत घट;

Mobile market; 70% preference for local shopping and 30% preference for online | मोबाईल मार्केट; स्थानिक खरेदीला ७० तर ऑनलाइनला ३० टक्के पसंती

मोबाईल मार्केट; स्थानिक खरेदीला ७० तर ऑनलाइनला ३० टक्के पसंती

Next

सोलापूर : वर्क फ्रॉम होम... ऑनलाइन शिक्षण.... स्पधेर्मुळे किमतीत झालेली घट... कमी टक्केवारीत होणारा कजार्चा जलद पुरवठा... अशा अनेक कारणांमुळे मोबाईलच्या खरेदीत झपाट्याने वाढ होतानाचे चित्र दिसून येत आहे़ मागील १५ दिवसात सोलापुरात २५ हजार मोबाईल (स्मार्टफोन) ची विक्री झाली आहे़ स्थानिक खरेदीची टक्केवारी वाढली असून ऑनलाइन खरेदीला फक्त ३० टक्के ग्राहकांनी पसंती दिल्याची माहिती सोलापूर मोबाईल असोसिएशनच्या पदाधिका?्यांनी दिली.

कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली़ या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला पसंती दिली़ याशिवाय शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणाला अधिक महत्त्व आले़ त्यामुळे स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ झाली़ दसरा अन् दिवाळीच्या तोंडावर अनेक मोबाईल कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोनच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी कमी केल्याने खरेदीत वाढ झाल्याचेही मोबाईल विक्रेत्यांनी सांगितले़
-------------
१० कोटींची उलाढाल...
मागील पंधरा दिवसांत शहरातील विक्रेत्यांनी २५ हजारांपेक्षा जास्त मोबाईलची विक्री केली़ यंदा ब्रॅन्डेड कंपन्यांचे मोबाईल ८ हजारांपासून ते ५० हजार रूपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत़ याशिवाय अन्य कंपन्यांचे मोबाईल ३ हजार ६०० रुपयांपासून विक्रीस उपलब्ध आहेत़ लॉकडाऊननंतर खरेदी वाढावी, यासाठी स्थानिक विक्रेत्यांनी खरेदीवर बक्षिसे, आॅफर्स ठेवल्याने खरेदीत वाढ झाली. २५ हजार मोबाईलमधून शहरात १० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज मोबाईल विक्रेत्यांनी वर्तविला.

--------------
‘व्होकल फॉर लोकल’साठी घेणार पुढाकार...
स्थानिक पातळीवरील खरेदी वाढावी, यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्होकल फॉर लोकलबाबत संकल्प ठेवण्याचा सल्ला दिला होता़ त्यानुसार ग्राहकांनी वस्तू खरेदीसाठी स्थानिक बाजारपेठेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले होते़ आपल्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील ग्राहक ऑनलाइन वस्तू खरेदी न करता स्थानिक बाजारपेठेतून वस्तू खरेदी करतील, यासाठी मोबाईल असोसिएशनच्या वतीने येत्या दिवाळीत नवा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मोबाईल असोसिएशन आॅफ सोलापूरचे अध्यक्ष हिशाम शेख यांनी सांगितले़
------------
दसरा हा सण महिना अखेरीस आल्यामुळे खरेदीत तशी वाढ दिसून आली नाही़ मात्र दिवाळीत मोबाईल क्षेत्रात मोठी उलाढाल होईल़ ग्राहकांनी ऑनलाइन खरेदीपेक्षा स्थानिक बाजारपेठेतील खरेदीवर जास्तीचा भर दिला पाहिजे़
- पंकज फाटे,
संजय एंटरप्रायजेस, सोलापूर

Web Title: Mobile market; 70% preference for local shopping and 30% preference for online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.