शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं  लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 15:20 IST

दक्षिण तालुक्यातील कुंभारी येथील घटना; शेळी चोरण्यासाठी आल्याचा आरोप; हाडं मोडेपर्यंत मारहाण

ठळक मुद्देमयत तरुण हा आपल्यासोबत  तीन साथीदार आहेत असे सांगत होता, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे,पण त्याच्यासोबत त्याचे साथीदार होते की नाही  याचा तपास पोलीस करत आहेतआरोपींनी त्या तरुणास  मारण्यासाठी काठ्या, लाकडे असे जे साहित्य वापरले ते पोलिसांनी जप्त केले

सोलापूर : शेळी चोरण्यासाठीचोरांची टोळी आली म्हणत चार जणांनी मिळून हल्ला चढवून एका तरुणाला जमावानं झाडाला उलटं लटकावून बरगड्याचे हाड तुटेपर्यंत मारहाण केली. यामुळे अज्ञात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे ही घटना घडली.

मयत तरुणाचे वय ३५ वर्षांच्या आसपास आहे. याबाबत कुंभारीच्या चौघांविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, अण्णाराव पाटील यांच्या कुंभारीतील शेतात शेळी फार्मिंग आहे. तेथे मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास हा अज्ञात तरुण आला. तेव्हा कुत्रे जोरजोरात भुुंकू लागल्याने पाटील यांना जाग आली. मयत संशयित तरुण शेळी पळवून नेण्याच्या प्रयत्न करत होता तेव्हा आरोपी गेनसिद्ध सिद्धप्पा माळी, अण्णाराव सोमलिंग पाटील, ओगसिद्ध ऊर्फ योगेश भीमप्पा आमसे, बरगली ऊर्फ बाबूशा शिवप्पा बन्ने (सर्व रा. कुंभारी ता. द. सोलापूर) यांनी मयत तरुणाला पकडून लाकडी बांबू, काठ्यांनी त्याच्या डोक्यावर, बरगड्यावर, बेदम मारहाण केली. 

दरम्यान, मयत तरुण बेशुद्ध पडला तेव्हा या घटनेची माहिती जिल्हा ग्रामीण पोलीस कंट्रोलला कळविल्यानंतर वळसंग पोलीस घटनास्थळी धावले. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वी तो मयत झाला. याबाबत मारहाण करणाºया सर्व आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून फौजदार ख्वाजा मुजावर यांनी त्यांना अटक केली. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मानगावे करत आहेत. 

हॉस्पिटलमध्ये उपचारापूर्वीच मृतग्रामीण पोलीस कंट्रोलवरून वळसंग पोलिसांना निरोप आल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. तेव्हा ‘तो’ तरुण झाडाला बांधलेल्या अवस्थेत उलटे लटकताना आढळला. त्याला पोलिसांनी उपस्थितांच्या मदतीने खाली उतरवून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदनाच्या वेळी त्या तरुणाच्या शरीरावर मोठ्या जखमा दिसून आल्या. त्याच्या शरीरातील अनेक भागाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले. 

‘मैं पूने से आया हूं, मेरे साथ तीन लोग हैं’आरोपींनी संशयित चोराला पकडल्यानंतर त्याला विचारणा केली असता त्या तरुणाने ‘मैं पूने से आया हूं, मेरे साथ तीन लोग हैं, वो सब भाग गये’, असे तो संशयित चोर म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पोलिसांची शोधमोहीममयत तरुण हा आपल्यासोबत  तीन साथीदार आहेत असे सांगत होता, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे, पण त्याच्यासोबत त्याचे साथीदार होते की नाही  याचा तपास पोलीस करत आहेत. त्यावेळी आरोपींनी त्या तरुणास  मारण्यासाठी काठ्या, लाकडे असे जे साहित्य वापरले ते पोलिसांनी जप्त केले आहे. संबंधित प्रकार नेमका काय आहे यासाठी वळसंग पोलिसांनी शोधमोहीम जारी ठेवली आहे. दरम्यान अटक केलेल्या चौघांच्या जाबजबाबातून आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीThiefचोरMurderखून