शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे सोलापूर, माढा लोकसभेतील काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळेल बळ ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:21 IST

मराठी पाट्या, परप्रांतीयांचा रोजगार अशा अनेक प्रश्नांवर आक्रमकपणा दाखवणाºया मनसेने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देदुष्काळ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला सोलापूर जिल्ह्यात राज ठाकरे यांच्या हस्ते आर्थिक मदत दिली.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट मतदारसंघातील मनसे  उमेदवार फारुक शाब्दी यांना २८,६०० मते पडली होतीमाढा तालुक्यातील लऊळ अशा अनेक ग्रामपंचायतींवर मनसेचे उमेदवार सदस्य म्हणून निवडून गेले आहेत  त्या कार्यकर्त्यांच्या ताकदीचा काँग्रेस - राष्ट्रवादीला फायदा होणार

सोलापूर : दोन वर्षांपूर्वी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेची शहर आणि जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त झाली असली तरी अद्यापही या पक्षाकडे काही कार्यकर्त्यांची कुमक आहे. सोलापूर आणि माढा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या उमेदवाराला या कार्यकर्त्यांचे थोडेबहुत बळ मिळू शकते, अशी स्थिती आहे. 

मराठी पाट्या, परप्रांतीयांचा रोजगार अशा अनेक प्रश्नांवर आक्रमकपणा दाखवणाºया मनसेने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

दोन वर्षांपूर्वी सोलापूरसह अनेक ठिकाणी  कार्यकारिणी बरखास्त केली़ त्यानंतर कार्यकर्ते आणि पक्ष वाढू शकला नाही.या पक्षात गटबाजीही होत राहिली़ पक्षातील ही धुसफूस पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली;  मात्र याकडे   वरिष्ठांनीही लक्ष दिले नाही़ त्यानंतर पक्षाकडूनही फारसे कार्यक्रम आणि कामेदेखील होऊ शकली नाहीत.

 उलट पक्षश्रेष्ठींचे दुर्लक्ष आणि पक्षातील मरगळीला कंटाळून माजी शहराध्यक्ष युवराज चुंबळकर आणि उमेश रसाळकरसह जवळपास ५०० कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी सेनेत प्रवेश केला.

पक्षातील या दुफळीचा भाजप उमेदवारालाही काही प्रमाणात लाभ होणार आहे़ काही दिवसांपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचाराचा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे़ सध्या तरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे १५ एप्रिल रोजी होणाºया सभेकडेच लक्ष केंदित आहे.

जिल्हा परिषद, ग्रा़ पं़, पंचायतमध्ये प्रभाव दाखवला

  • दुष्काळ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला सोलापूर जिल्ह्यात राज ठाकरे यांच्या हस्ते आर्थिक मदत दिली. अनेक कामेही केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट मतदारसंघातील मनसे
  •  उमेदवार फारुक शाब्दी यांना २८,६०० मते पडली होती. काँंग्रेसच्या मतावर याचा परिणाम झाला होता. टाकळी जिल्हा परिषद सदस्य, नरखेड, वैराग,मोडनिंब,  माळशिरस, इस्लामपूर,
  •  माढा तालुक्यातील लऊळ अशा अनेक ग्रामपंचायतींवर मनसेचे उमेदवार सदस्य म्हणून निवडून गेले आहेत  त्या कार्यकर्त्यांच्या ताकदीचा काँग्रेस - राष्ट्रवादीला फायदा होणार आहे.
टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढाMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे