मनसेकडून पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेची पूजा; दर्शन रांगेतील भविकांचेही केले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 11:16 IST2020-11-16T11:16:02+5:302020-11-16T11:16:54+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मनसेकडून पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेची पूजा; दर्शन रांगेतील भविकांचेही केले स्वागत
सोलापूर : दीपावली पाडव्यादिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उघडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व भाविकांना मास्क, सॅनिटायझर, लाडू प्रसाद, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, उपजिल्हा अध्यक्ष दिलिप पाचंगे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, उपाध्यक्ष महेश पवार, आकाश धोत्रे, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, उपतालुका अध्यक्ष हेमंत पवार, कृष्णा मसाळ, प्रताप भोसले, प्रथमेश पवार, अर्जुन जाधव, सचिन शिंदे, नागेश इंगोले, वैभव इंगोले, दत्ता वलेकर, गणपत मोरे, संतोष भुईटे, महिला आघाडीच्या रंजना इंगोले, पूजा लवंगकर इत्यादी उपस्थित होते.