शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

नियामक मंडळाच्या बैठकीला आमदारांची दांडी

By admin | Updated: July 11, 2014 01:40 IST

दोन आमदार हजर : उद्दिष्ट १४,४४३ घरांचे, झाली अवघी ३४१ घरे

सोलापूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने गुरुवारी आयोजित केलेल्या नियामक मंडळाच्या बैठकीस आमदार आणि खासदारांनी उपस्थित राहणे अपेक्षित असताना आ़ गणपतराव देशमुख आणि आ़ बबनराव शिंदे हे दोन आमदार वगळता उर्वरित लोकप्रतिनिधींनी बैठकीला दांडी मारली़ केंद्राने देखील या योजनेकडे हात आखडता घेतल्यामुळे दारिद्र्यरेषेखालील अनेक कुटुंबांच्या घरांचे स्वप्न धुळीस मिळत आहे़जि़प़ अध्यक्षा डॉ़ निशिगंधा माळी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी नियामक मंडळाची तिमाही बैठक पार पडली़ यामध्ये गरिबांच्या घरांसाठी केंद्राच्या असणाऱ्या इंदिरा आवास आणि राजीव निवारा या योजनांबद्दल चर्चा झाली़ सन २०१३-१४ मध्ये जिल्ह्यातील बीपीएल कुटुंबांसाठी १४ हजार ४४३ घरे बांधण्याचे नियोजन केले होते, मात्र केंद्राने हे उद्दिष्ट कमी केले़ त्यामुळे उद्दिष्ट १४४३ वर आले़ या घरांसाठी केंद्राकडून ५२ हजार ५०० तर राज्याकडून ३७ हजार ५०० रुपये अनुदान दिले जाते़ या १४४३ पैकी ३४१ घरकुले पूर्ण झाली असून, उर्वरित ११४२ घरकुले अपूर्ण असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली़ -------------------------आ़ बबनराव शिंदेंचा ठिय्यामाढा तालुक्यातील रखडलेल्या विविध कामांबद्दल आ़ बबनराव शिंदे यांनी जिल्हा परिषदेत ठिय्या मांडला होता़ रस्ते, तीर्थक्षेत्र योजनेतील कामे तातडीने सुरू करा, असे आदेश त्यांनी बांधकाम विभागातील संजय माळी यांना दिले़ आम्ही वारंवार पाठपुरावा करतो, काही कारणास्तव कामे सुरू होत नाहीत़ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि माढा तालुक्यातील आम्ही दिलेल्या प्रस्तावानुसार कामे सुरू करावीत, असे त्यांनी सांगितले़ यावेळी जि़प़ अध्यक्षा डॉ़ निशिगंधा माळी, समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते़ सन २०१३-१४ या वर्षासाठी १४ हजार ४४३ घरे बांधण्याचे उद्दिष्ट होते़ त्याप्रमाणे प्रशासकीय मान्यता दिली मात्र केंद्राने हे उद्दिष्ट १४४३ वर आणले़ त्यामुळे दारिद्र्यरेषेखाली अनेक लोकांना घरे मिळणे अवघड झाले आहे़ याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे़- डॉ़ निशिगंधा माळीजि़ प़ अध्यक्षा