शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

बेपत्ता मित्राच्या मुलाला शोधताना लादेन देऊ लागले बेवारस, वारस प्रेतांना मुक्ती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 7:09 PM

पोलिसांना लाभते सहकार्य : मदतीच्या भावनेने अंत्यसंस्कारासाठी गरिबांना पैसे देण्यातही पुढाकार

ठळक मुद्दे माणसाचा जीव असताना त्याला किंमत असते. जीव गेला की त्याची अवस्था जनावरासारखी होतेजीवन खूप सुंदर आहे़ चांगलं जगावं, चांगलं राहावं आणि सन्मानानं मरण पत्करावंदेवाने माझ्यावर वारस-बेवारस मृतदेहाचं काम करण्याची संधी दिली आहे. माणुसकीचा धर्म म्हणून मी या कामाकडे पाहतो

संताजी शिंदे 

सोलापूर : मित्राच्या व्यसनाधीन मुलाचे व्यसन सोडविण्यासाठी एसटी बसने दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिद्धापूरला घेऊन जाताना हा मुलगा हातचा निसटून गेला अन् बेपत्ता झाला. एका शववाहिका चालकाशी दोस्ती करून त्या मुलाला शोधता शोधता शास्त्रीनगरातील लादेन उर्फ जहाँगीर शेख यांना समाजसेवेची प्रेरणा मिळाली अन् ते बेवारस प्रेतांवर कायद्याच्या चौकटीत राहून अंत्यसंस्कार करू लागले. अशी प्रेते काढताना पोलिसांना मदत करू लागले. शिवाय गरिबांच्या घरातील कुणी मृत पावल्यास अंत्यसंस्कारासाठी मदतही करू लागले.

मित्राच्या आग्रहावरून २00६ साली लादेन अहमद याला सिद्धापूर (दक्षिण सोलापूर) येथील समाजाच्या मशिदीत मुलाला सोडण्यासाठी जात होते. सिद्धापूरला जाताना एस.टी. बेगमपूर- कामतीच्या दरम्यान एका थांब्यावर थांबली. 

एस.टी. थांबताच मित्राच्या मुलाला खाली उतरविले, लादेन यांनी त्याला विरोध केला असता त्याने दगडफेक करण्यास सुरूवात केली. कसेबसे त्याला रोखून धरले झाडाखाली बसवले. मुलाच्या वडिलाला फोन करण्यासाठी लादेन काही अंतरावर असलेल्या ढाब्यावर गेले. मात्र ही संधी साधून मित्राचा मुलगा अहमद निघून गेला, आपल्या हातून मित्राचा मुलगा बेपत्ता झाल्याचे शल्य लादेन यांना बोचत होते. तो कुठेतरी भेटेल या आशेने लादेन ठिकठिकाणच्या एस.टी.स्टॅन्डवर शोध घेत होते. काहीच पत्ता लागत नव्हता. मित्राचा मुलगा व्यसनी असल्याने तो कुठेतरी बिकट परिस्थितीत भेटेल या आशेने त्यांनी अ‍ॅब्म्युलन्स चालक मजिद शेख यांना अहमदची माहिती दिली. कालांतराने लादेन मजिद शेख यांच्यासोबत अ‍ॅम्ब्युलन्स मधून फिरत होते.

फिरत असताना ते बेवारस-वारस मृतदेह काढून त्यांना रूग्णालयात आणू लागले. मृत्यूनंतर माणसाची अवस्था पाहून सख्खे नातेवाईकसुद्धा जवळ येत नव्हते. तिथे लादेन पुढे जाऊन मृतदेह काढू लागले. लादेनचे काम पाहून समाजाच्या लोकांनी कौतुक केले, प्रोत्साहन दिले. लादेन यांनी २00८ साली बैतुलमाल सिफा कमिटीची स्थापना केली. एखाद्या मयताच्या वारसाला अंत्यविधीसाठी पैसे नसतील तर त्याचा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास सुरूवात केली. समाजातील काही दानशूर व्यक्तींनीही या कार्याला मदत करण्यास सुरूवात केली. लादेन यांनी स्वत:ची अ‍ॅम्ब्युलन्स व्हॅन घेतली आणि माणुसकीच्या सेवेला गती दिली. 

पोलिसांचा पहिला फोन लादेनला...- शहरात किंवा अन्यत्र जर खून झाला असेल, फाशी किंवा अन्य प्रकारची आत्महत्या असेल, विहिरीत पडून मृत्यू झाला असेल, अपघाती मृत्यू असेल अशा पद्धतीचा माणसाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झालेला असेल तर प्रेत उचलण्यासाठी लादेन यांना पोलिसांचा फोन येतो. चोवीस तास उपलब्ध असलेले लादेन आपली अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन घटनेच्या दिशेने निघतात.

- माणसाचा जीव असताना त्याला किंमत असते. जीव गेला की त्याची अवस्था जनावरासारखी होते. दररोज मृतदेह काढून सवय झाली आहे. जीवन खूप सुंदर आहे़ चांगलं जगावं, चांगलं राहावं आणि सन्मानानं मरण पत्करावं. देवाने माझ्यावर वारस-बेवारस मृतदेहाचं काम करण्याची संधी दिली आहे. माणुसकीचा धर्म म्हणून मी या कामाकडे पाहतो़ त्यातून मिळणाºया मानधनावर घर चालवतो. बेवारस मृतदेहाचा शोध लागला की त्यांच्या नातेवाईकांकडे पोहोचवण्याचं काम करतो. लोक रडतात, आभार मानतात मी त्यांच्या दु:खात सहभागी होतो आणि निघून येतो. असे जहाँगीर शेख उर्फ लादेन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस