भूलतज्ज्ञांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे
By Admin | Updated: August 4, 2014 01:15 IST2014-08-04T01:15:58+5:302014-08-04T01:15:58+5:30
डॉ. चक्रराव : सोलापुरात भूलतज्ज्ञांची राष्ट्रीय परिषद

भूलतज्ज्ञांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे
सोलापूर : भूलतज्ज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे तसेच ज्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी रुग्णांना भूल देऊ नये, असे आवाहन भूलतज्ज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एस. एस. सी. चक्रराव (काकीनाडा, आंध्रप्रदेश) यांनी केले़
सोलापूर अॅनेस्थीशोलॉजिस्टस सोसायटीतर्फे हॉटेल बालाजी सरोवर येथे रविवारी दिवसभर भूलतज्ज्ञांची राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती, त्यावेळी उद्घाटनप्रसंगी डॉ़ चक्रराव बोलत होते़ यावेळी सोलापूर भूलतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मंजुषा शहा, सचिव डॉ. मंजिरी देशपांडे, डॉ. राहुल स्वामी, डॉ. नीलेश दिंडोरे, डॉ. तुम्मा, डॉ. पुष्पा अग्रवाल, संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. सतीश देशपांडे आदी उपस्थित होते़
डॉ़ चक्रराव म्हणाले, भूलतज्ज्ञ शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे संशोधन झाले आहे, त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, ग्रामीण भागात सुविधा असतील तरच भूल द्यावी़ भूलतज्ज्ञांनी यावेळी विविध स्टिप्स सांगितल्या़
या परिषदेत राज्यभरातून २00 डॉक्टर सहभागी झाले होते़ परिसंवादामध्ये डॉ. अशोक बधे (पाँडिचेरी), डॉ. रवींद्र (शिमोगा), डॉ. सुनील पंडया (हैदराबाद), डॉ. शकील मोमीन (कोल्हापूर), डॉ. माया जामकर (पुणे), डॉ. प्रज्ञा भालेराव (पुणे), डॉ. हेमंत शिंदे (मुंबई), डॉ. हितेंद्र महाजन (नाशिक) आदींनी सहभाग घेतला़ भूलशास्त्रातील नऊ विषयांवर यावेळी व्याख्याने झाली़