शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुजात आंबेडकरांना किरकोळ अपघात, प्रचारावेळी जिप्सी गाडीतून तोल गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 18:33 IST

सोलापूर येथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर उमेदवाराच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते

सोलापूर - भाजप व शिवसेनेने जाहीर केलेले जाहीरनामे हे महाराष्ट्रातील जनतेसाठी जुमलेच ठरणार असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी सोलापूर दौऱ्यावेळी केली. सुजात आंबेडकर हे विधानसभा निवडणुकीत उभारलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी, सोलापुरातील प्रचार रॅलीदरम्यान सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांना किरकोळ जखम झाली असून माझी प्रकृती उत्तम असून पुढील नियोजित दौरे करणार असल्याचेही त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन म्हटले आहे. 

मागील पाच वर्षांपूर्वी भाजपने सत्तेत येण्यासाठी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झाली नाहीत. कोणाच्याही खात्यावर 15 लाख आले नाहीत. कोणत्याही शेतकऱ्यांना हमीभाव दिला नाही, आत्महत्या थांबल्या नाहीत, पाणीप्रश्न सुटला नाही, धनगरांना आरक्षण दिले नाही मग यावर्षी दिलेल्या जाहीरनाम्यातील कोणत्या गोष्टी पूर्ण होतील यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही, अस सुजात आंबेडकर यांनी सोलापूरातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले.  

सोलापूर येथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर उमेदवाराच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील रुपाभवानी मंदिर परिसरात त्यांची प्रचाररॅली होती. त्यावेळी, अचानक कार्यकर्ते गाडीसमोर आल्यामुळे ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबला. त्यावेळी आपला बॅलन्स न करणे अशक्य झाल्याने सुजात आंबेडकर गाडीतील पुढील सीटवर पडले. या अपघातात त्यांच्या ओठाला किरकोळ जखम झाली, अशी माहिती सोलापूरचे वंचित बहुजन आघाडीचे प्रचारप्रमुख नगरसेवक गणेश पुजारी यांनी दिली. 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीSolapurसोलापूरAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Accidentअपघात