‘लोकमत’च्या बातमीची राज्यमंत्र्यांनी घेतली दखल; त्या अंध कलाकाराला घेतले दत्तक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 11:19 AM2020-07-14T11:19:12+5:302020-07-14T11:19:19+5:30

प्रहार संघटनेची माणुसकी; मदतीच्या पैशातून गहाण ठेवलेले हार्मोनियम परत मिळविले..

Minister of State takes note of Lokmat news; Adopted that blind artist ... | ‘लोकमत’च्या बातमीची राज्यमंत्र्यांनी घेतली दखल; त्या अंध कलाकाराला घेतले दत्तक...

‘लोकमत’च्या बातमीची राज्यमंत्र्यांनी घेतली दखल; त्या अंध कलाकाराला घेतले दत्तक...

Next

 बºहाणपूर : अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर येथील अंध कलाकार राचय्या मुगळीमठ यांच्यावर लॉकडाऊनमुळे कोसळलेल्या संकटाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात आली. मुगळीमठ यांची करूण कहाणी वाचून आजवर अनेकांनी आर्थिक मदत करत आहेत, मात्र मुगळीमठ यांच्या आयुष्यातील दु:खाचे डोंगर दूर करण्यासाठी ठोस पावले उचलणे ही गरजेची बाब आहे.

लोकमत’ मधील अंध कलाकाराची बातमी वाचून राज्याचे सामाजिक राज्यमंत्री व प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी सोलापूर जिल्ह्यातील आपल्या कार्यकर्त्यामार्फत फोनवरून संपर्क साधून अंध कलाकाराला मदत करण्याचे आदेश देताच कार्यकर्ते थेट तोळणूरला पोहोचले. यानंतर विदारक परिस्थिती पाहून शासनाची मदत मिळेपर्यंत संपूर्ण दिव्यांग कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी प्रहार संघटना दत्तक घेण्यास तयार असल्याचे मनोगत प्रहार संघटनेचे सोलापूर शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

तोळणूर येथील अंध कलाकार राचय्या मुगळीमठ हे दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यांची पत्नी अपंग आहे़ वडील, भाऊ मतिमंद आहेत. केवळ आईच शाररिक दृष्ट्या सक्षम असून गावात पिट मागून शेतकºयांच्या शेतात खुरपणी करून पतीसह सर्व दिव्यांग कुटुंबाला सांभाळते. कोरोनामुळे संपूर्ण कुटुंब बिकट परिस्थितीत आहेत व त्या अंध कलाकाराने लॉकडाऊन काळात जगण्यासाठी स्वत:चा हार्मोनियम गहाण ठेवला होता. 

रविवारी याविषयी ‘लोकमत’मधून बातमी प्रकाशित होताच राज्याचे सामाजिक राज्यमंत्री व प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी सोलापूर येथील प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून तोळणूर गावच्या दिव्यांग कुटुंबाची संपूर्ण माहिती घेऊन त्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावे व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी दिले, त्यानंतर  सोलापूर जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्याशी फोन वरून माहिती देऊन संपर्क साधल्यानंतर त्याने तात्काळ माझी वाट न बघता स्वत: जाऊन मदत करा असे सांगितले व शहर प्रहार संघटनेचे सर्व कार्यकर्ते थेट अंध कलाकार राचय्या मुगळीमठ यांच्या घरी भेट देऊन त्या कुटुंबाची व्यथा प्रत्यक्ष पाहून त्यांना पाच हजाराची आर्थिक मदत केली व शासनाची मदत मिळेपर्यंत त्या कुटुंबाला प्रहार संघटना दत्तक घेतल्याचे जाहीर केले.

यावेळी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, शहर कार्याध्यक्ष खालील मणियार, शहर उपाध्यक्ष मुस्ताक शेतसंधी, मुदतसर हुंडेकरी, धानय्या कवटगीमठ, सोमशेखर जमशेट्टी, शरणप्पा फुलारी, भीमाशंकर वग्गे, श्रीशैल रब्बा, वैजनाथ रब्बा यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Minister of State takes note of Lokmat news; Adopted that blind artist ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.