शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

एमआयएमची यादी जाहीर; शहर मध्यमधून फारुक शाब्दी, ‘दक्षिण’मधून सोफिया शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:54 AM

विधानसभा निवडणूक; एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी राज्यातील चार उमेदवारांची यादी जाहीर केली.

ठळक मुद्देएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी राज्यातील चार उमेदवारांची यादी जाहीर केलीशहर मध्य विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख दावेदार होते तौफिक शेख यांच्या पत्नी सोफिया शेख यांना सोलापूर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली

सोलापूर  : एमआयएमने शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून फारुक शाब्दी तर सोलापूर दक्षिण मतदारसंघातून सोफिया तौफिक शेख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी रविवारी राज्यातील चार उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात जिल्ह्यातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख दावेदार होते. परंतु, विजयपूर येथील रेश्मा पडकनूर यांच्या खून प्रकरणात त्यांना अटक झाली आहे. ते सध्या विजयपूर येथील तुरुंगात आहेत. त्यामुळे पक्षाने तौफिक शेख यांचा पत्ता कट केला. त्यांच्या जागी उद्योजक फारुक शाब्दी यांना उमेदवारी दिली. तौफिक शेख यांच्या पत्नी सोफिया शेख यांना सोलापूर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.

सांगोला मतदारसंघातून शंकर सरगर उमेदवार असतील. एमआयएमच्या नई जिंदगी येथील कार्यालयात शाब्दी आणि शेख यांचे स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी तौफिक शेख तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा दिल्या. पक्षाने उमेदवार तौफिक शेख यांच्या पत्नी सोफिया यांना शहर मध्यमधून का उमेदवारी दिली नाही?, असे विचारले असता शाब्दी म्हणाले, निर्णय घेण्यापूर्वी पक्षाने तौफिक शेख यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर पक्षाने निर्णय घेतला. सोलापूर दक्षिणमध्ये पक्षाचे नगरसेवक आहेत. त्याचा फायदा सोफिया शेख यांना होणार आहे. 

जे होईल ते पाहता येईल - सोफिया शेख - उमेदवारीबद्दल सोफिया शेख यांना प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या, ‘ही तर माझी सुरुवात आहे. जे होईल ते पाहता येईल. एवढंच सांगते’. जनतेला आमच्या पक्षाबद्दल आपुलकी आहे. त्याच जोरावर आम्ही जिंकू, असे स्पष्टीकरण दिले. 

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-city-central-acसोलापूर सिटी सेंटरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकImtiaz Jalilइम्तियाज जलीलAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPoliticsराजकारण