शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दूध पंढरीचा औरंगाबाद, पुण्यात ‘पॅकिंग दूध प्रकल्प’ ’ सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 17:35 IST

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने पॅकिंग पिशवीतून दूध विक्री करण्यासाठी पुणे, औरंगाबाद, हैदराबाद व अमरावती येथे भाडेतत्त्वावर प्लॉन्ट घेऊन तेथून ‘पॅकिंग’पिशवीतून दूध विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे

ठळक मुद्देसोलापूरसह राज्यात सध्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहेदूध संघाने केगाव येथील प्रकल्पातून दही तयार करण्यास सुरूवात केलीपहिल्या टप्प्यात पुणे व औरंगाबाद येथे हे प्रकल्प १५ दिवसात सुरू करण्याची तयारी केली आहे

सोलापूर : अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूर सहकारी दूध संघाने (दूध पंढरी) पहिल्या टप्प्यात पुणे व औरंगाबाद येथे पॅकिंग दूध विक्री प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, पॅकबंद दही प्रकल्प सुरू केला असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे यांनी दिली.सोलापूरसह राज्यात सध्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. जगातील बाजारपेठेत दूध पावडरीचे दर कोसळल्याने राज्यातील पावडर प्रकल्प बंद पडले आहेत. पावडरीसाठी वापरले जाणारे दूध बाजारात विक्रीसाठी आल्याने अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर झाला आहे. आॅक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत दूध वाढीचा कालावधी असतो त्यातच पावडरीसाठीचे दूध बाजारात आल्याने उदंड झाले दूध अशी स्थिती झाली आहे. 

यामुळे सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने पॅकिंग पिशवीतून दूध विक्री करण्यासाठी पुणे, औरंगाबाद, हैदराबाद व अमरावती येथे भाडेतत्त्वावर प्लॉन्ट घेऊन तेथून ‘पॅकिंग’पिशवीतून दूध विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात पुणे व औरंगाबाद येथे हे प्रकल्प १५ दिवसात सुरू करण्याची तयारी केली आहे. किमान एक एप्रिलपासून या शहरात दूध पंढरीचे दूध पॅकिंग पिशवीतून विक्री सुरू होईल असे व्यवस्थापकीय संचालक मुळे यांनी सांगितले. त्यानंतर हैदराबाद, अमरावती व अन्य ठिकाणीही पॅकिंग पिशवी दूध विक्री प्रकल्प सुरू केले जाणार आहेत.  

दूध संघाने केगाव येथील प्रकल्पातून दही तयार करण्यास सुरूवात केली असून सध्या दररोज ५०० ते ७०० लिटर दही  तयार करुन त्याची शहरातच विक्री केली जात असून मागणीप्रमाणे पुरवठा वाढविणार असल्याचे सांगण्यात आले.हक्काचे मार्केट तयार होईल: परिचारक- वैभववाडी येथे टँकरने दूध नेऊन तेथे पॅकिंग करुन गोव्याला सध्या १० हजार लिटर दूध विक्री केली जात असून कोकणातही पॅकिंग दुधाची विक्री सुरू होणार असल्याचे दूध पंढरीचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. केगावला बाटली बंद दूध प्रकल्पाचे(निर्जंतुक सुगंधी दूध) काम सुरू असून दीड-दोन महिन्यात ते बाजारात विक्रीसाठी येईल. हे दूध  तयार झाल्यापासून किमान चार महिने टिकेल,   हक्काचे मार्केट तयार केले तरच बाजारात टिकाव लागेल असे आ. परिचारक म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरAurangabadऔरंगाबादPuneपुणे