शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या सहभागामुळे सोलापूर जिल्ह्यातील दूध संकलन ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 15:19 IST

सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनास शेतकºयांच्या सहभागामुळे मोठा प्रतिसाद मिळाल्याने दूध संकलनावर परिणाम झाला. सोलापूर जिल्ह्यात खासगी संस्था  व सहकारी संघाचे दररोज सकाळी ७ ते ८ लाख लिटर संकलन होत असताना अवघे ११ हजार लिटर संकलन झाल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले. जिल्ह्याचे खासगी  व सहकारी संघाचे दोन ...

ठळक मुद्देखासगी  व सहकारी संघाचे दोन वेळचे संकलन १२ लाख लिटरदूध उत्पादक शेतकरी शासनावर वैतागलाशेतकरी स्वत:हून दूध बंद आंदोलनात सहभागी

सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनास शेतकºयांच्या सहभागामुळे मोठा प्रतिसाद मिळाल्याने दूध संकलनावर परिणाम झाला. सोलापूर जिल्ह्यात खासगी संस्था  व सहकारी संघाचे दररोज सकाळी ७ ते ८ लाख लिटर संकलन होत असताना अवघे ११ हजार लिटर संकलन झाल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले. जिल्ह्याचे खासगी  व सहकारी संघाचे दोन वेळचे संकलन १२ लाख लिटर इतके आहे. 

प्रतिलिटर पाच रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा करावे किंवा दूध संकलन करणाºया संस्थांनी दूध खरेदी दर पाच रुपयाने वाढवावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवार दिनांक १६ जुलैपासून दूध बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सकाळी खासगी जवळपास सर्वच संस्थांनी दूध संकलन बंद ठेवले होते. अगोदर दुधाला दर परवडणारा नसल्याने शेतकºयांची नाराजी असल्याने शेतकरीही दूध घालण्यास नाखूश असताना आंदोलकांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी संकलनासाठी सुट्ट्याच घेण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे दररोजचे (दोन वेळचे) संकलन एक लाख ४८ हजार लिटर असून सकाळी ७० ते ७४ हजार लिटर दूध संकलन असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा संघाचे सोमवारी सकाळी ११ हजार लिटर दूध संकलन झाले होते. जिल्ह्यातील तालुकास्तरावरील डॉक लगतच्या शेतकºयांनी स्वत:हून हे दूध पोहोच केल्याचे सांगण्यात आले. सहकारी संघाला दररोज जवळपास दोन लाख व खासगी संघाकडे दररोज संकलन होणारे १०  लाख लिटर असे १२ लाख लिटर दूध संकलन होत असल्याचे जिल्हा दूध विकास कार्यालयातून सांगण्यात आले. शहरालगतच्या गावातील गवळ्यांनी मात्र नेहमीप्रमाणे रतिबाचे दूध पोहोच केल्याचे दिसून आले.  

शेतकºयांचाच सहभाग...- मागील वर्षभरापासून दुधाचा दर वाढवून मिळण्याऐवजी दर काही महिन्याच्या अंतराने दर कमी केला जात आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी वैतागला आहे. तोट्यातील दूध धंदा बंदही करता येईना व दूध घेणाºया खासगी व सहकारी संस्था दर वाढवूनही देत नसल्याने शेतकरी शासनावर नाराज आहेत. दूध दर परवडणारे नसल्याने नाराज असलेले शेतकरी स्वत:हून दूध बंद आंदोलनात सहभागी झाले असल्याचे चित्र ग्रामीण भागातून दिसत आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरmilkदूधFarmerशेतकरीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना